तूतीकोरिन : तामिळनाडूच्या तूतीकोरिन जिल्ह्यात तपातीजवळ सोमवारी एका ट्रकने उभ्या व्हॅनला उडविल्याने ९ जण ठार झाले. तर दुसऱ्या अपघातात झारखंडमध्ये वऱ्हाडाची बस उलटल्याने सात जण ठार झाले. तूतीकोरिन जिल्ह्यातील नागरिक पुतियामपुत्तुर येथील एका कार्यक्रमाहून व्हॅनने परतत होते. टायर फुटल्याने एका ठिकाणी टायर बदलले जात होेते. याच वेळी एका भरधाव ट्रकने पाठीमागून या व्हॅनला उडविले. यात तीन महिला आणि एका मुलासह ९ जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत.
दोन अपघातांत १६ जण ठार
By admin | Updated: May 10, 2016 03:15 IST