शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बालगृहात आणण्यापूर्वी १५७५ मुलांची लैंगिक छळवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 04:22 IST

देशभरातील बालगृहे तसेच आश्रयगृहांत वास्तव्याला असलेली १५७५ मुले मुक्तता करून या ठिकाणी आणण्यापूर्वी लैंगिक छळवणुकीला बळी पडली आहेत.

नवी दिल्ली - देशभरातील बालगृहे तसेच आश्रयगृहांत वास्तव्याला असलेली १५७५ मुले मुक्तता करून या ठिकाणी आणण्यापूर्वी लैंगिक छळवणुकीला बळी पडली आहेत. संपूर्ण देशातील ९,५९८ बाल संगोपन संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले असता हे धक्कादायक वास्तव समोर आले, अशी माहिती केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.१५७५ मुले आणि मुली लैंगिक छळवणुकीचे शिकार होत असतील तर तुम्ही त्या बालकांसाठी काय केले, असा सवाल न्या. मदन बी. लोकूर यांनी केंद्राची बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांना विचारला. चाईल्डलाईन इंडिया फाउंडेशनने त्या त्या राज्यांच्या सहभागातून केलेले सर्वेक्षण तुम्ही समोर आणले आहे, पण त्यानंतर काहीही घडलेले नाही, असे आनंद यांनी सांगितले. त्यावर न्या. लोकूर यांनी कोणत्याही राज्यांनी याबाबत कारवाई केलेली नाही. त्यामुळे या मुलांसाठी काहीही करण्यात आलेले नाही. त्यांचा लैंगिक छळ होतच राहणार का, असा प्रश्नही विचारला. एस. अब्दुल नाझीर आणि दीपक गुप्ता या अन्य न्यायाधीशांचा खंडपीठात समावेश आहे.आपल्या सभोवती काही घडत असेल आणि वृत्तपत्रांमध्ये बातम्या येत असतील तर आपल्याला डोळे बंद ठेवता येणार नाहीत, असे न्या. गुप्ता यांनी म्हटले. डिसेंबर २०१५ ते मार्च २०१७ या दोन वर्षांच्या काळातील सर्वेक्षणाचा अहवाल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. बाल अधिकार संरक्षण राष्टÑीय आयोगाने बाल संगोपनाबाबत राष्टÑीय सामाजिक अंकेक्षण चालविले असून, आॅक्टोबर २०१८मध्ये हे काम पूर्ण होईल. (वृत्तसंस्था)नुसती आकडेवारी नको...मुलांबाबत अंकेक्षण हे केवळ आकडेवारी गोळा करण्यापुरते नसावे. बालगृहातील मुलांच्या स्थितीबाबत सक्रिय असे मूल्यांकन केले जावे. मुलांशी बोला, ते आनंदी आहेत की दु:खी ते समजून घ्या, असे न्या. गुप्ता यांनी बजावले.

टॅग्स :Rapeबलात्कारnewsबातम्या