शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
3
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
4
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
5
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
6
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
7
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
8
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
9
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
10
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
11
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
12
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
13
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
14
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
15
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
16
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
17
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
18
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
19
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
20
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!

१५ अतिरेक्यांना घातले कंठस्नान

By admin | Updated: June 10, 2015 03:39 IST

मणिपूरमध्ये हल्ल्यात १८ जवानांचे प्राण हिरावणाऱ्या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराच्या विशेष दलाने मंगळवारी थेट म्यानमारमध्ये धडक देत १५ अतिरेक्यांचा खात्मा केला आहे.

मणिपूर हल्ल्याला प्रत्युत्तर : भारतीय लष्कराची म्यानमार सीमेपार कारवाई नवी दिल्ली : मणिपूरमध्ये हल्ल्यात १८ जवानांचे प्राण हिरावणाऱ्या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराच्या विशेष दलाने मंगळवारी थेट म्यानमारमध्ये धडक देत १५ अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. मणिपूरमधील हल्ल्यात सहभागी गट म्यानमारमध्ये दडून असल्याची गुप्त माहिती मिळाल्याच्या आधारावर ही मोहीम पार पाडण्यात आली.म्यानमारमधील अधिकाऱ्यांनी गोपनीय माहिती पुरविण्यात सहकार्य केले. एनएससीएन (के) व केवायकेएल या २ दहशतवादी गटांचा हल्ल्यात सहभाग होता. भारतीय लष्कराने एकही जवान न गमावता या दोन्ही गटांच्या १५ अतिरेक्यांचा खात्मा करीत मोहीम फत्ते केली. मणिपूरमधील हल्ल्यानंतर लष्कराला अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. आणखी हल्ले घडविले जाणारे असल्याची गुप्त माहिती मिळताच ही मोहीम हाती घेण्यात आली. भारत- म्यानमार सीमेवरील दोन स्थळांवर, नागालँड व मणिपूर सीमेवर तसेच म्यानमारमध्येही कारवाई करण्यात आली. त्यासाठी म्यानमारच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय राखण्यात आला, असे अतिरिक्त संचालक मेजर जनरल रणबीरसिंग यांनी सांगितले.प्रथमच भारतीय लष्कराने सीमापार धडक देत कमांडो मोहीम चोखपणे पार पाडली. दहशतवादाविरुद्ध ठोस कृतीचे ते निदर्शक ठरते. ईशान्येकडे दहशतवादी गटांनी हल्ल्यांची मालिकाच चालविल्याचे पाहता विशिष्ट अशा गोपनीय माहितीचा आधार घेण्यात आला. दहशतवाद्यांशी जोरदार धुमश्चक्री झाली. अतिरेक्यांनाच ठार मारण्याचे लक्ष्य ठरविण्यात आल्याने नागरिकांची प्राणहानी टाळता आली. ४ जून रोजी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले होते. अतिरेकी सीमाभागात घुसखोरीनंतर हल्ले करून परतणार असल्याने त्यांना सीमेपलीकडे जाऊन मारणेच योग्य ठरले. म्यानमार आणि भारताच्या निकटस्थ सहकार्याचा एक इतिहास राहिला आहे. यापुढेही दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी अशाच प्रकारे ठोस कृती केली जाईल, असेही जन. रणबीरसिंग म्हणाले. एनएससीएन(के) या अतिरेक्यांच्या गटाने मार्चमध्ये शस्त्रीसंधीतून माघार घेतल्यानंतर हल्ल्यांची मालिका घडवत धुमाकूळ चालविला होता. अन्य अतिरेकी गटांना ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट आॅफ साऊथ इस्ट इंडिया’ या छत्राखाली एकजूट करीत या संघटनेने कारवायांना वेग दिला होता.जशास तसे उत्तरलगेच हल्ल्यांचा धोका लक्षात घेता तातडीने कारवाई आवश्यक होती. नियोजित हल्ले परतवून लावण्यासाठी ही मोहीम पार पाडण्यात आली. आपली सुरक्षा आणि राष्ट्रीय एकात्मतेवर हल्ले केले जात असतील तर असेच ठोस प्रत्युत्तर दिले जाईल. सीमा भाग आणि सीमेवरील राज्यांमध्ये शांतता आणि सलोखा राखण्याची हमी दिली जाईल.- मेजर जनरल रणबीरसिंग (लष्करी मोहिमांचे अतिरिक्त संचालक)