शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यावर 15 लाख खर्च; सुप्रीम कोर्टाने कर्नाटक सरकारला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 12:54 IST

बंगळुरू बॉम्बस्फोटातील दहशतवादी अब्दूल नासिर मदनीला त्याच्या मुलाच्या लग्नासाठी घेऊन जाण्यासाठी १५ लाख रूपये खर्च करणाऱ्याला कर्नाटक सरकारला सुप्रीम कोर्टाने चांगलंच फटकारलं आहे.

ठळक मुद्देबंगळुरू बॉम्बस्फोटातील दहशतवादी अब्दूल नासिर मदनीला त्याच्या मुलाच्या लग्नासाठी घेऊन जाण्यासाठी १५ लाख रूपये खर्च करणाऱ्याला कर्नाटक सरकारला सुप्रीम कोर्टाने चांगलंच फटकारलं आहे. आरोपीच्या सोबत जाणं, हे पोलिसांचं कर्तव्य आहे. त्यासाठी त्यांना प्रवास भत्ता मिळतो. त्यामुळे अतिरिक्त खर्च कशाला हवा?

नवी दिल्ली, दि. 4- बंगळुरू बॉम्बस्फोटातील दहशतवादी अब्दूल नासिर मदनीला त्याच्या मुलाच्या लग्नासाठी घेऊन जाण्यासाठी १५ लाख रूपये खर्च करणाऱ्याला कर्नाटक सरकारला सुप्रीम कोर्टाने चांगलंच फटकारलं आहे. आरोपीच्या सोबत जाणं, हे पोलिसांचं कर्तव्य आहे. त्यासाठी त्यांना प्रवास भत्ता मिळतो. त्यामुळे अतिरिक्त खर्च कशाला हवा? जरा कॉमन सेन्सचा वापर करा, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने कर्नाटक सरकारला फटकारलं आहे. मदनीला कोर्टाने 13 दिवस पोलीस कस्टडीत राहण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी मदनीला केरळला घेऊन जायला सरकारने 15 लाख रूपयांची मागणी केली. 

मदनीची २००८ मधील बंगळुरू सीरियल बॉम्बस्फोट प्रकरणी ट्रायल सुरू आहे. मदनीला त्याच्या आजारी आईला भेटण्याची आणि मुलाच्या लग्नाला उपस्थित राहण्याची सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली होती. तसंच त्याला १३ दिवस केरळमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली होती.पण यासाठी येणारा सगळा खर्च मदनीलाच करावा लागेल, असंही कोर्टाने आदेशात म्हंटलं होतं. पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही कर्नाटक सरकारने मदनीवर झालेल्या खर्चाचं जीएसटी जोडून १४.८ लाखाचं बिल कोर्टात सादर केलं. या बिलानुसार कर्नाटक सरकारने मदनीला केरळला घेऊन जाणाऱ्या एसीपीच्या एस्कॉर्ट टीमसाठी २.६ लाख रूपयांची मागणी केली. तसंच बाकी रक्कम एस्कॉर्ट टीमच्या इतर 18 सदस्यांसाठी होती. यावर न्यायाधीश एस.ए. बोबडे आणि एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने राज्यसरकारला चांगलंच फटकारलं. आरोपीं सोबत जाणं हा पोलिसांच्या कर्तव्याचा भागच आहे. त्यावर खर्च करण्याची गरज काय? असा सवाल सुप्रीम कोर्टाने अधिकाऱ्यांना विचारला. अधिकाऱ्यांना प्रवास भत्ता आणि डिए मिळत असल्याचंही कोर्टाने यावेळी सांगितलं. 

'सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर तुम्ही असंच काम करता का?, असा सवाल खंडपीठाने उपस्थित केला. 'कोणतीही गोष्ट किचकट करू नका. आम्ही राज्यांकडून गंभीर अपेक्षा करत आहोत. तुमचे अधिकारी लवकरच कर्तव्यावर असतील आणि त्यासाठी त्यांना पगार मिळतो. त्यांना फक्त टीए-डिएच मिळेल, असंही कोर्टाने म्हंटलं. आरोपीची ने-आण करण्या व्यतिरिक्त टीम कोणतं विशेष काम करत होती का? कॉमन सेन्सचा वापर करा, एस्कॉर्टिंगच्या दरम्यान त्यांचं काम फक्त एका व्यक्तीवर नजर ठेलणं, इतकंच आहे. अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने कर्नाटक सरकारला फटकारलं आहे.