जयपूर : येथील एक चहावाला सद्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आला आहे. त्याला कारणही तसेच आहे. लीला राम नावाच्या या चहावाल्याने आपल्या सहा मुलींच्या लग्नात दीड कोटींचा हुंडा दिल्याचे सांगितले जात आहे. या चहावाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. मुलींच्या सासरच्या व्यक्तींसोबत लीला राम पैशांचे गठ्ठे मोजताना दिसत आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात त्याच्या सहाही मुलींचा विवाह झाला. प्राप्तिकर विभागाने या प्रकरणात या चहावाल्यास नोटीस बजावली आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. राजस्थानात आजही हुंड्याची प्रथा मोठ्या प्रमाणात आहे. हुंडा देणे वा घेणे गुन्हा असला तरी आजही असा हुंडा सर्रास दिला जात असल्याचे दिसून येत आहे.
चहावाल्याने दिला दीड कोटींचा हुंडा
By admin | Updated: April 14, 2017 01:04 IST