शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात प्रदूषित 15 शहरांमध्ये भारताच्या 14 शहरांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 09:34 IST

लिस्टमध्ये सगळ्यात टॉपवर कानपूर शहर आहे.

नवी दिल्ली- जिनीवामध्ये ग्लोबल एअर पॉल्यूशनकडून (डब्ल्यूएचओ)  2016साठी जगातील सगळ्यात 15 प्रदूषित शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील 14 शहरांचा समावेश आहे. या लिस्टमध्ये सगळ्यात टॉपवर कानपूर शहर आहे. तर दिल्ली सहाव्या स्थानी आहे. डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार, 2010 ते 2014 मध्ये दिल्लीमध्ये प्रदूषण पातळीत सुधारणा झाली होती पण त्यामध्ये 2015मध्ये परिस्थिती पुन्हा बिघडली. कानपूर, फरिदाबाद, गया, पाटणा, आग्रा, मुझ्झफरपूर, श्रीनगर, जयपुर, जोधपुर यासारख्या शहरात प्रदूषणाची पातळी सर्वाधिक आहेत. भारताबरोबरच कुवेत, चीन, मंगोलिया या देशातील शहरांचाही समावेश आहे.

2016च्या तुलनेत 2017 मध्ये वायू प्रदूषणमध्ये सुधारणा झाली, असा दावा सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्डाने केला आहे. पण अजूनही बोर्डाने 2017 च्या हवेत असलेल्या पीएम 2.5 चा डेटा जारी केला आहे. 2016च्या शेवटी वायू प्रदूषणची समस्या सोडविण्यासाठी अनेक पावलं उचलली गेली. ऑक्टोबरमध्ये ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन, डिसेंबर 2015मध्ये इन्वारमेंटल कंपनसेशन चार्ज आणि प्रदूषण नियंत्रणासाठी एनसीआर शहरांमध्ये प्रदूषण नियंत्रणाचे उपाय अशा विविध गोष्टी सहभागी आहेत. डब्ल्यूएचओचा रिपोर्ट 2016 पर्यंतचा असल्याने प्रदूषण नियंत्रणासाठी केलेल्या उपायांच्या परिणामाची नेमकी माहिती समोर आली नाही.  2010च्या रिपोर्टनुसार दिल्ली दुनियेतील सर्वात प्रदूषित शहर होतं. त्यानंतर पेशावर आणि रावलपिंडीचा नंबर होता. त्यावेळी दुनियेतील 10 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारताच्या इतर शहरांमध्ये फक्त आगराचा समावेश होता. 2011 च्या रिपोर्टमध्येही दिल्ली व आगरा प्रदूषित शहरांच्या यादीत होतं व उलानबाटर दुनियेतील सर्वात प्रदूषित शहर होतं. 2012मध्ये परिस्थिती बदलायला सुरूवात झाली. दुनियेतील 20 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये एकट्या भारताच्या 15 शहरांचा सहभाग आहे. 2013, 2014 आणि 2015मध्ये दुनियेतील 20 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारताच्या चार ते सात शहरांचा समावेश होता.