शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

१४ नक्षलींचा खात्मा, एक कोटींचे बक्षीस असलेला सीपीआय (माओवादी) गटाचा नेता ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 07:42 IST

14 Naxalites killed: छत्तीसगड-ओडिशा सीमेजवळ गरियाबंद जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाने चकमकीत १४ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यात सीपीआय (माओवादी) या संघटनेच्या नेत्याचाही समावेश असून त्याला पकडण्यासाठी सरकारने १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

रायपूर/भुवनेश्वर -  छत्तीसगड-ओडिशा सीमेजवळ गरियाबंद जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाने चकमकीत १४ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यात सीपीआय (माओवादी) या संघटनेच्या नेत्याचाही समावेश असून त्याला पकडण्यासाठी सरकारने १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. यामुळे नक्षलवादी चळवळीला तडाखा बसला आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी सांगितले. हे ऑपरेशन ३६ तासांहून अधिक काळ चालले.

छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निखिल राखेचा यांनी सांगितले की, खात्मा केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये जयराम उर्फ चलपती याचा समावेश आहे. तो सीपीआयच्या (माओवादी) केंद्रीय समितीचा सदस्य आहे. त्याला पकडण्यासाठी १ कोटींचे बक्षीस जाहीर केले होते. ठार झालेल्या अन्य नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. त्यात दोन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे.

शाह म्हणाले की, नक्षलवादापासून भारताला मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांतील आणखी एक पुढचे पाऊल आम्ही टाकले. ओडिशा, छत्तीसगडच्या सीमा भागात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत १४ नक्षलवादी ठार झाले. देशात नक्षलवाद आता अखेरच्या घटका मोजत आहे.

पोलिसांनी सांगितले की, चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे, दारुगोळा, आयईडी जप्त करण्यात आले. मंगळवारी देखील सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू ठेवली होती. (वृत्तसंस्था)

भारताची नक्षलवादापासून मुक्तता करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केला आहे. हे लक्ष्य आम्ही नक्की साध्यकरणार आहोत. - अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

भाजपच्या नेतृत्वाखालील डबल-इंजिन सरकारच्या कामगिरीमुळे छत्तीसगडमार्च २०२६ पर्यंत नक्षलवादापासून मुक्त होईल.- विष्णुदेव साय, मुख्यमंत्री, छत्तीसगड

कोणी पार पाडली मोहीम?छत्तीसगड पोलिसांच्या जिल्हा राखीव गार्ड (डीआरजी), केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कोब्रा कमांडो आणि ओडिशा पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुप (एसओजी) यांनी ही संयुक्त कारवाई केली. 

१ कोटीचे बक्षीस ज्याच्यावर, तो चलपती नेमका कोण होता?मृत्यू झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील रहिवासी चलपती याचाही समावेश आहे, त्याच्यावर १ कोटींचे बक्षीस होते. सुरक्षा दलांवर अनेक हल्ले आणि एका आमदाराच्या हत्येमागेही त्याचा हात असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगड