शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 14 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 08:27 IST

अपघातात 40 हून अधिक जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भोपाळ :  मध्य प्रदेशातील रीवा येथे आज पहाटे एक मोठी दुर्घटना घडली. रीवा येथे शनिवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ता अपघातात बस आणि ट्रकसह तीन वाहनांची धडक झाली. बस आणि ट्रकच्या धडकेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात 40 हून अधिक जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस हैदराबादहून लखनौला जात होती. या बसमध्ये 100 हून अधिक प्रवासी होते आणि मृतांपैकी बहुतांश उत्तर प्रदेश आणि बिहारमधील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात 40 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, ब्रेक न लागल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर अनेक जण बसमध्ये अडकले, मात्र पोलिस-प्रशासनाच्या तत्परतेमुळे त्यांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात अनेकांचे हात पाय कापले गेले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिसऱ्या वाहनाची माहिती अद्याप समोर आलेली नाही. बस-ट्रक घटनास्थळी आहे, मात्र तिसरे वाहन फरार आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशAccidentअपघात