शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी जवानाला १४ दिवसांची कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 06:16 IST

२२ राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत असलेला जितेंद्र ऊर्फ जितू फौजी याला काश्मीरमधील सोपोर येथून उत्तर प्रदेश पोलिसांनी शनिवारी अटक करून बुलंदशहर येथे आणले

बुलंदशहर : उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यात उसळलेल्या हिंसाचारात गोळीबार करून पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह व सुमित या युवकाला ठार केल्याचा आरोप असलेला लष्करी जवान जितेंद्र मलिक याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.२२ राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत असलेला जितेंद्र ऊर्फ जितू फौजी याला काश्मीरमधील सोपोर येथून उत्तर प्रदेश पोलिसांनी शनिवारी अटक करून बुलंदशहर येथे आणले. जितेंद्रचा भाऊ धर्मेंद्र याने पत्रकारांना सांगितले की, कोणीतरी कट रचून माझ्या भावाला अडकविले आहे. त्याने सुबोधकुमार सिंह यांची हत्या केलेली नाही. हा प्रकार घडला त्यावेळी माझा भाऊ तिथे उपस्थित नव्हता, याचे पुरावे आमच्याकडे आहेत. आपण कोणालाही ठार केलेले नाही, असे या जवानाने पोलिसांना सांगितले आहे.बदल्यांबाबत सरकार काय म्हणते?वरिष्ठ पोलीस अधीक्षक कृष्णाबहादूर सिंह, सियाना भागाचे पोलीस अधिकारी सत्यप्रकाश शर्मा, चिंग्रावती पोलीस ठाण्याचे प्रमुख अधिकारी सुरेशकुमार या तिघांची बदली करण्यात आली होती; मात्र या नियमित स्वरूपाच्या बदल्या असून, त्याचा गोहत्येच्या कारणावरून बुलंदशहर जिल्ह्यात उसळलेल्या हिंसाचाराशी काहीही संबंध नाही, असे सरकारच्या सूत्रांनी म्हटले आहे.