लोकसभेत ठरले हाेते १३३ तास काम; प्रत्यक्षात झाले ४५ तास, वाया ८८ तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2023 06:13 AM2023-04-07T06:13:18+5:302023-04-07T06:13:48+5:30

दरदिवशी लोकसभेत सरासरी दोन तासांपेक्षा कमी कामकाज

133 hours of work was decided in the Lok Sabha; 45 hours actually done, 88 hours wasted | लोकसभेत ठरले हाेते १३३ तास काम; प्रत्यक्षात झाले ४५ तास, वाया ८८ तास

लोकसभेत ठरले हाेते १३३ तास काम; प्रत्यक्षात झाले ४५ तास, वाया ८८ तास

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: उद्याेगपती अदानी यांच्या जेपीसी चाैकशीची मागणी व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निलंबनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभा व राज्यसभेत निश्चित झाल्याप्रमाणे कामकाज झाले नाही. लोकसभेत दरदिवशी सरासरी दोन तासांपेक्षा कमी कामकाज झाले. गुरुवारी संसदेचे अधिवेश संस्थगित झाले.

या अधिवेशनात विरोधकांसोबत सत्तारुढ पक्षाच्या खासदारांनीही गोंधळ घातल्याने लोकसभा अध्यक्षांना कामकाज अनेकदा दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही कामकाज होऊ शकले नाही. दुसऱ्या टप्प्यात मात्र केवळ ६.४० टक्के कामकाज होऊ शकले. 

  • राज्यसभा- १०३ तास ३० मिनिटे कामकाज राज्यसभेत झालेल्या गोंधळामुळे वाया गेले.
  • लाेकसभा- ४५ तास ५५ मिनिटे कामकाज होऊ शकले. सरासरी दोन तासांपेक्षा सुद्धा कमी येते.
  • एकूण २५ बैठका


अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात बऱ्यापैकी कामकाज होऊ शकले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १३ तास ४४ मिनिटे चर्चा झाली.

Web Title: 133 hours of work was decided in the Lok Sabha; 45 hours actually done, 88 hours wasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.