१३ वर्षीय मुलीचा विनयभंग
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
नागपूर : १३ वर्षांच्या मुलीला अश्लील हातवारे करून तिचा नेहमी विनयभंग करणाऱ्या एका आरोपीवर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. हिंमतराव दौलतराव इंगोले (वय ४९) असे आरोपीचे नाव आहे. तो बेसा मार्गावरील मंगलदीप नगरात राहतो. घराजवळ राहणाऱ्या एका १३ वर्षांच्या मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून आरोपीची वाईट नजर आहे. तिचा हात पकडून जवळ ओढणे, शिकवणी वर्गाला जात असताना तिला अश्लील हातवारे करून त्रास देणे, असे प्रकार दोन महिन्यांपासून आरोपी करतो. ९ डिसेंबरला त्याने असेच कृत्य केले. पीडित मुलीने आपल्या पालकांना ही माहिती दिली. त्यावरून मोठा वाद झाला. आरोपीने निर्ढावलेपणाने पालकांशी वाद घातला. पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ अन्वये गुन्हे दाखल करून आरोपी इंगोलेला
१३ वर्षीय मुलीचा विनयभंग
नागपूर : १३ वर्षांच्या मुलीला अश्लील हातवारे करून तिचा नेहमी विनयभंग करणाऱ्या एका आरोपीवर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. हिंमतराव दौलतराव इंगोले (वय ४९) असे आरोपीचे नाव आहे. तो बेसा मार्गावरील मंगलदीप नगरात राहतो. घराजवळ राहणाऱ्या एका १३ वर्षांच्या मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून आरोपीची वाईट नजर आहे. तिचा हात पकडून जवळ ओढणे, शिकवणी वर्गाला जात असताना तिला अश्लील हातवारे करून त्रास देणे, असे प्रकार दोन महिन्यांपासून आरोपी करतो. ९ डिसेंबरला त्याने असेच कृत्य केले. पीडित मुलीने आपल्या पालकांना ही माहिती दिली. त्यावरून मोठा वाद झाला. आरोपीने निर्ढावलेपणाने पालकांशी वाद घातला. पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ अन्वये गुन्हे दाखल करून आरोपी इंगोलेला अटक केली. ---