शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराच्या शिबिरावरच दरड काेसळून १३ जवानांचा मृत्यू; मणिपूरमधील घटना, अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 14:28 IST

प्राप्त माहितीनुसार, तुपुल रेल्वे स्थानकाजवळ काम सुरू हाेते. जवळच १०७ टेरिटाेरियल आर्मीचे शिबिर हाेते. बुधवारी रात्री उशिरा भूस्खलनामुळे माेठी दरड या शिबिरावरच काेसळली.

इंफाळ : मणिपूरमधील नाेनी जिल्ह्यात एका रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण भूस्खलनात टेरिटाेरियल आर्मीच्या १३ हून अधिक जवानांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगाऱ्यामुळे इजेई नदीचा प्रवाह अडला आहे. त्यामुळे त्याआधीचा भाग जलमय हाेण्याची शक्यता आहे.प्राप्त माहितीनुसार, तुपुल रेल्वे स्थानकाजवळ काम सुरू हाेते. जवळच १०७ टेरिटाेरियल आर्मीचे शिबिर हाेते. बुधवारी रात्री उशिरा भूस्खलनामुळे माेठी दरड या शिबिरावरच काेसळली. त्यामुळे अनेक जवान ढिगाऱ्याखाली अडकले. आतापर्यंत १३ जणांचे मृतदेह काढले आहेत. आणखी किमान ४० जण दबलेले असल्याची शक्यता आहे. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी घटनेनंतर एक आपात्कालीन बैठक बाेलावली. डाॅक्टरांचे एक पथक तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आले. खराब वातावरणामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे लष्कराचीही मदत घेण्यात येतआहे. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बीरेन सिंह यांच्यासह रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संवाद साधून बचाव कार्याची माहिती घेतली.  गेल्या काही दिवसांपासून ईशान्य भारतात प्रचंड पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन व दरडी काेसळण्याच्या घटना घडत आहेत. 

नदीचा प्रवाह अडलाढिगाऱ्यामुळे इजाई नदीचा प्रवाह अडला आहे. त्यामुळे तेथे बंधाऱ्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.हा बंधारा फुटल्यास नदीपात्राच्या आजुबाजूच्या गावांमध्ये भीषण पूर येऊ शकताे. त्यामुळे प्रशासनाने ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम हाती घेतले आहे. 

टॅग्स :SoldierसैनिकIndian Armyभारतीय जवान