शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

१३ प्रकल्प पर्यावरण मंत्रालयाकडे प्रलंबित; महाराष्ट्राला आहे केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 06:02 IST

केंद्र सरकारने ऑगस्ट २०१८ मध्ये  परिवेश ही ऑनलाईन एक खिडकी सुरू केल्यानंतरही राज्य आणि केंद्रीय स्तरावरही प्रलंबित प्रकल्पांची संख्या वाढत आहे.

- हरिश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  महाराष्ट्राचे १३ प्रकल्प मंजुरीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रलंबित आहेत. केरळचे सर्वाधिक १५ प्रकल्प केंद्रीय  पर्यावरण मंत्रालयाकडे प्रलंबित आहेत.  १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण १०४  प्रकल्प पर्यावरण मंत्रालयाकडे मंजुरीसाठी रेंगाळून  पडले आहेत.

केंद्र सरकारने ऑगस्ट २०१८ मध्ये  परिवेश ही ऑनलाईन एक खिडकी सुरू केल्यानंतरही राज्य आणि केंद्रीय स्तरावरही प्रलंबित प्रकल्पांची संख्या वाढत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार पर्यावरण मंजुरीसाठी ३,९३७ प्रस्तावावर  सर्व राज्यांत राज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव आकलन प्राधिकरणात कार्यवाही केली जाते. जोरदार प्रयत्न आणि धोरणात्मक पुढाकारामुळे केंद्र सरकारस्तरांवर प्रलंबित प्रकल्पांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे, असा दावा केंद्राने केला आहे.  पर्यावरण मंजुरीसाठी केंद्रीय स्तरांवरील प्रकल्पांसाठी मूल्यामापनासाठी  तज्ज्ञ मूल्यांकन समितीची महिन्यात दोनदा बैठक घेण्यात येते. पंतप्रधान कार्यालयही स्थितीवर लक्ष ठेवून आहे.

काेणत्या राज्यातील कीती प्रकल्प प्रलंबित?महाराष्ट्र, पंजाब (४) , ओडिशा (७), छत्तीसगढ (७) या राज्यांना पर्यावरणीय मंजुरीसाठी   ताटकळत राहावे लागते. विरोधी पक्षशासित केरळचे १५ प्रकल्प केंद्रीय स्तरावर प्रलंबित आहेत. तथापि,  भाजपशासित गुजरात (१३), हरयाणा (११), उत्तर प्रदेश (६) आणि  अन्य राज्यही पर्यावरण मंत्रालयाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.