शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! मशरूम खाणं बेतलं जीवावर; 'या' ठिकाणी 13 जणांचा मृत्यू; 39 जणांवर उपचार सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 11:22 IST

मशरूम खाणं काही लोकांना चांगलंच महागात पडलं असून ते त्यांच्या जीवावर बेतलं आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. मशरूम खाणं काही लोकांना चांगलंच महागात पडलं असून ते त्यांच्या जीवावर बेतलं आहे. आसाममधील दिब्रुगडमध्ये आठवडाभरात जंगली विषारी मशरूम खाल्ल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 39 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात  दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या लोकांपैकी बहुतेकांना किडनी आणि यकृताच्या समस्या होत्या. यामध्ये आतापर्यंत 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एएमसीएचचे अधीक्षक डॉ.प्रशांत दिहिंगिया यांनी ही माहिती दिली आहे. दिहिंगिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, विषारी मशरूम खाल्ल्यानंतर आजारी पडलेल्या अनेक लोकांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती ठीक आहे. तर यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मागील पाच दिवसांत पूर्व आसाममधील शिवसागर, दिब्रुगड, चराईदेव आणि तिनसुकिया जिल्ह्यातील चहाच्या बागेतील 35 लोकांना AMCH मध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच जंगली मशरूम खाल्ल्यानंतर दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडतात. हा मशरूम खाण्यायोग्य नाही. जंगली हानीकारक मशरूमच्या सेवनाबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Assamआसाम