शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

‘इंडिया’त आणखी १३ पक्ष, मुंबईच्या बैठकीत दिसणार ताकद; पवार-ठाकरेंच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 09:42 IST

प्रागतिक विकास मंचाचे ‘इंडिया आघाडी’च्या मुंबईतील बैठकीत जयंत पाटील प्रतिनिधित्व करत आहेत.  

- सुनील चावके/एस.पी. सिन्हा 

नवी दिल्ली : शेकापचे जयंत पाटील आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील १३ छोटे-मोठे पक्ष आणि सामाजिक संघटनांचा समावेश असलेला ‘प्रागतिक विकास मंच’ मुंबईत होत असलेल्या ‘इंडिया आघाडी’मध्ये सामील होणार आहे. याचवेळी एनडीएच्या बैठकीत सहभागी ३८ पक्षांपैकी चार पक्ष विरोधी आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे.

प्रागतिक विकास मंचाचे ‘इंडिया आघाडी’च्या मुंबईतील बैठकीत जयंत पाटील प्रतिनिधित्व करत आहेत.  राजकारणात काही महिन्यांपासून सत्ताधारी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस युती तसेच महाविकास आघाडीपासून ‘प्रागतिक विकास मंचा’ने  समान अंतर राखले होते; पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना-ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे ‘प्रागतिक विकास मंचा’ने आता ‘इंडिया आघाडी’च्या व्यासपीठावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

२०१९ मध्ये बजावली महत्त्वाची भूमिका...- २०१९ साली महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यातही ‘प्रागतिक विकास मंचा’ने महत्त्वाची भूमिका बजावली होती. - महाराष्ट्रात २०२४ ची लोकसभा निवडणूक अतिशय अटीतटीची होण्याची चिन्हे असून, महाराष्ट्राच्या पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये प्रभाव असलेल्या या १३ पक्षांच्या समूहामुळे राज्यभर विखुरलेल्या पुरोगामी मतांचा ‘इंडिया आघाडी’ला लाभ होईल, असे गणित मांडले जात आहे. 

देशपातळीवर ‘इंडिया’ महाराष्ट्रात ‘मविआ’समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, डॉ. सुरेश माने यांची बहुजन विकास पार्टी तसेच डाव्या आणि रिपब्लिकन विचारांचे नेते आणि सामाजिक संघटनांचा त्यात समावेश आहे. तेरा पक्षांचा हा मंच राष्ट्रीय राजकारणात ‘इंडिया आघाडी’चा, तर राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीचा घटक असेल. 

‘मला फक्त सर्वांना एकत्र आणायचे आहे’- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची ‘इंडिया’च्या संयोजकपदी नियुक्ती करण्यावरून बरेच राजकारण होत आहे. - अशा स्थितीत समन्वयक बनविण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितले की, मला काहीही बनायचे नाही आणि कोणतीही इच्छा नाही. - मी ही बाब पुन्हा पुन्हा सांगत आहे आणि पुन्हा सांगतो की, मला फक्त सर्वांना एकत्र आणायचे आहे.

डिसेंबरमध्ये लोकसभा? भाजपने सर्व हेलिकॉप्टर घेतली भाड्याने...केंद्रातील सत्ताधारी भाजप येत्या डिसेंबर महिन्यात लोकसभा निवडणुका घेण्याची शक्यता असल्याचा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.  भाजपने सर्व हेलिकॉप्टर भाड्याने घेतली असून त्यांचा लोकसभा निवडणुकांतील प्रचारासाठी उपयोग करणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेवर आला तर देशाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणूक प्रचारासाठी हेलिकॉप्टरचा वापर करता येऊ नये यासाठी भाजपने ही खेळी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये होणे अपेक्षित असताना त्याआधी भाजप निवडणुका घेऊ शकतो. आम्ही आगामी लोकसभा निवडणुकांत भाजपला पराभूत करू.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडी