शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये फर्टिलायझर्स केमिकल कारखान्यामधून वायूगळती झाल्याने १३ मुले बेशुद्ध    

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 16:02 IST

Gas Leak From Fertilizer Chemical Factory In Kota: राजस्थानमधील कोटा येथील चंबल फर्टिलायझर्स केमिकल लिमिटेड कंपनीमधून शनिवारी वायू गळती झाली. या वायुगळतीमुळे १३ शालेय मुलांना त्रास होऊन ती बेशुद्ध पडली.

राजस्थानमधील कोटा येथील चंबल फर्टिलायझर्स केमिकल लिमिटेड कंपनीमधून शनिवारी वायू गळती झाली. या वायुगळतीमुळे १३ शालेय मुलांना त्रास होऊन ती बेशुद्ध पडली. यापैकी ७ मुलांना कोटा येथील एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित मुलांवर सीएफसीएल डिस्पेंसरीमध्ये उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोटा-बारां महामार्गावर गढेपान येथे सीएफसीएल केमिकलचा कारखाना आहे. शनिवारी दुपारी येथून अचानक विषारी वायूची गळती झाली. त्यामुळे मुलं बेशुद्ध पडली.

सध्या ही गॅस गळती कशी झाली, याबाबत अधिक माहिती समोर येऊ शकलेली नाही. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली असून, पुढील तपास केला जात आहे. या तपासानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, गॅस गळतीची माहिती मिळताच स्थानिक लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले. तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला,  मात्र स्थानिक लोक आक्रमक झाल्याने. त्यांची अधिकाऱ्यांसोबत वादावादी झाली. सद्यस्थिती येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच या वायूगळतीमुळे बेशुद्ध झालेल्या मुलांवर उपचार सुरू आहेत.  

टॅग्स :Rajasthanराजस्थान