शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

वक्फ बोर्डाकडून परत घेतल्या जाणार 123 मालमत्ता! केंद्राची नोटीस; यादीत दिल्लीच्या जामा मशिदीचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 15:30 IST

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सरकार असताना जामा मशीद वक्फ बोर्डाला देण्यात आली होती. मात्र आता सरकार दिल्लीतील 123 महत्त्वाच्या मालमत्ता परत घेणार आहे.

केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने वक्फ बोर्डाच्या 123 मालमत्ता परत घेण्यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. महत्वाचे म्हणजे यात दिल्लीतील जामा मशिदीचाही समावेश आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सरकार असताना जामा मशीद वक्फ बोर्डाला देण्यात आली होती. मात्र आता सरकार दिल्लीतील 123 महत्त्वाच्या मालमत्ता परत घेणार आहे.

केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने अधिसूचित नसलेल्या वक्फ मालमत्तेसंदर्भातील द्विसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे दिल्ली वक्फ बोर्डाच्या 123 मालमत्ता ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात मशीद, दर्गाह आणि कब्रस्तानांचा समावेश आहे. मंत्रालयाने दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आणि आपचे आमदार अमानुतल्लाह खान यांना पत्र लुरून निर्णयासंदर्भात माहिती दिली होती.

वक्फ बोर्डाला कागपत्रे सादर करण्याचे निर्देश - ज्या मालमत्ता परत घेण्यासंदर्भात नोटीस जारी करण्यात आली आहे, त्या या पूर्वी कधी ना कधी सरकारकडेच होत्या. मनमोहन सिंग सरकारच्या काळात या मालमत्ता वक्फ बोर्डाला सोपवण्यात आल्या होत्या. केंद्रीय शहरी मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भूमी आणि विकास कार्यालयाने वक्फ बोर्डाला जी नोटीस पाठवली आहे, त्यात आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे, ज्यांच्या सहाय्याने या मालमत्ता त्यांना का देण्यात याव्यात यासंदर्भात बोर्ड स्पष्टिकरण देऊ शकेल. 

उच्च न्ययालयाकडून नव्हता मिळाला दिलासा -  वक्फ बोर्डाने दिल्ली उच्च न्ययालयात याचिका दाखल करत, या सर्व मालमत्तांची मोड-तोड आणि दुरुस्तीचे काम इतर कुणीही करू नये, असे म्हटले होते. मात्र गेल्या मे महिन्यात उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. यानंतर उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर, केंद्र सरकारच्या शहर विकास मंत्रालयाने वक्फ बोर्डाला नोटिस जारी केली आहे.

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारdelhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालय