शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात १२0 कोटी जप्त; मतदारांना वाटण्यासाठी आला होता बेहिशेबी पैसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 06:44 IST

मतदानाला २४ तास शिल्लक असताना गुरुवारी सकाळी तेलंगणात पोलीस व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून तीन कोटी रुपये जप्त केले.

हैदराबाद : मतदानाला २४ तास शिल्लक असताना गुरुवारी सकाळी तेलंगणात पोलीस व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून तीन कोटी रुपये जप्त केले. या प्रकरणात आठ जणांना पोलिसांनी अटक केली. ही रक्कम कर्नाटकातून आली होती, अशी प्राथमिक आहे. पण ती कोणी व कोणासाठी पाठवली हे स्पष्ट झालेले नाही.सराफ व हिरे व्यापारी यांची ही रक्कम असल्याचा अंदाज आहे. पण हे खरे नाही. सराफ व हिरे व्यापारी इतके चाणाक्ष असतात की निवडणुकांच्या काळात आपल्याकडील काळाच काय, पण पांढरा पैसाही रोखीच्या स्वरूपात कुठे पाठवत नाहीत. त्यामुळे ही रक्कम मतदारांना वाटण्यासाठीच आली असणार, हे उघड आहे. ही एवढीच रक्कम नाही. आतापर्यंत तेलंगणात १२0 कोटी रुपये या पद्धतीने जप्त करण्यात आले. विधानसभेच्या ११९ मतदारसंघांत जप्त करण्यात आलेली रक्कम आहे १२0 कोटी रुपये. म्हणजे प्रत्येक मतदारसंघासाठी १ कोटींहून अधिक काळा पैसा आला आहे. पण ही जप्त करण्यात आलेली रक्कम आहे. जी रक्कम पकडली गेली नाही, ती याहून अधिक असावी, असा अंदाज आहे.विधानभा निवडणुकांच्या काळातच ही रक्कम आली, याचाच अर्थ ती मतदारांना थेट वाटण्यासाठी वा निवडणुकांवर खर्च करण्यासाठी होती, हे उघड आहे. निवडणूक अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सप्टेंबरमध्ये विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच आपले १0५ उमेदवार जाहीर केले. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला आणि त्यामुळे काळा पैसाही या काळात अधिक आला.मात्र राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीसाठी हा पैसा आला का, याचे उत्तर मात्र कोणीच द्यायला तयार नाही.>मध्यप्रदेशात २९ कोटी,राजस्थानात ३५ कोटीमध्य प्रदेशातील मतदानआधीच झाले आहे. तिथे २३0 विधानसभा मतदारसंघ आहेत. निवडणूक काळात मध्यप्रदेशात २९ कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली होती, तर राजस्थानात उद्या, शुक्रवारी मतदान व्हायचे आहे. तिथे आतापर्यंत ३५ कोटी रुपये पकडण्यात आले आहेत.>नोटाबंदीचा हेतू साध्य झाला नाहीनोटाबंदी जाहीर करताना मोदी यांनी काळ्या पैशाला आळा घालणे हाही एक हेतू असल्याचे जाहीर केले होते. पण तसे घडले नाही. नोटाबंदीमुळे निवडणुकांतील काळा पैसा कमी झाला नाही, असे निवृत्त निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी तीनच दिवसांपूर्वी सांगितले. त्यांचे म्हणणे खरे असल्याचे दिसते.कोट्यवधींची दारूही पकडली गेलीकेवळ पैशाचेच वाटप होत आहे, असे नसून, तेलंगणात उमेदवारांनी मतदारांना साड्या, शर्ट व पँटचे कापड, भांडी, धान्य याचेही वाटप केले आहे. दारू तर या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात वाटली गेली की विचारता सोय नाही. मतांसाठी लोकांना दारू प्यायला लावणे, हे फारच झाले. पण निवडणूक जिंकण्यासाठी तेलंगणात सर्व मार्गांचा सर्व पक्ष आणि उमेदवारांनी अवलंब केला आहे. काही कोटींची दारूही तेलंगणातील बहुसंख्य मतदारसंघांत पकडली गेली आहे.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018