शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

झेंडावंदन करून परतताना 8 वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 16:23 IST

देशभरात उत्साहात स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा होत असताना या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यावरून परतत असताना एका आठवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

ठळक मुद्देदेशभरात उत्साहात स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा होत असताना चंदीगडमध्ये या सोहळ्याला गालबोट लागलं आहे.स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यावरून परतत असताना एका आठवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

चंदीगड, दि. 15 - देशभरात उत्साहात स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा होत असताना चंदीगडमध्ये या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यावरून परतत असताना एका आठवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना येथे घडली आहे. शाळेत झेंडावंदन करून ही पीडित विद्यार्थिनी घरी परतत होती.  पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगडच्या सेक्टर 23 मध्ये सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित विद्यार्थिनी येथील एका सरकारी शाळेत शिक्षण घेते. शाळेतून ध्वजारोहण करून ती परतत होती. रस्त्यात आरोपीने विद्यार्थिनीचं अपहरण केलं. तिला चिल्ड्रन पार्कमध्ये नेऊन तेथे तिच्यावर बलात्कार केला. आरोपीच्या तावडीतून सुटका करून पीडित विद्यार्थिनी स्वतःच्या घरी पोहोचली आणि घडलेला प्रकार तिने घरच्यांना सांगितला. कुटुंबियांनी तात्काळ 100 नंबरवर फोन करून घटनेची माहिती पोलिसांना दिली. पीडितेचं कुटुंब सेक्टर 24 मध्ये राहतं. 

पोलिसांनी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल (पॉस्को) अॅक्ट आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  पीडितेने दिलेल्या माहितीनुसार प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.  तसंच पीडितेला वैद्यकिय तपासणीसाठी रूग्णालयात पाठवण्यात आलं आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. काही दिवसांपासून वर्णिका कुंडू प्रकरणामुळे चंदीगड चर्चेत आहे.