शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात ७२ तासांत १२ दहशतवाद्यांचा खात्मा, १४ वर्षांच्या मुलाचाही समावेश; सुरक्षा दलाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 00:49 IST

terrorists : अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार मारण्यात आलेले दहशतवादी लष्कर-ए-ताेयबा आणि अल बदर या संघटनांचे सदस्य हाेते.

- सुरेश एस. डुग्गर

जम्मू : काश्मीरमध्ये गेल्या दाेन दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकींमध्ये ४ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे, दहशतवाद्यांमध्ये १४ वर्षांच्या मुलाचाही समावेश हाेता. गेल्या तीन दिवसांमध्ये एकूण १२ दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला असून या वर्षी आतापर्यंत ४८ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार मारण्यात आलेले दहशतवादी लष्कर-ए-ताेयबा आणि अल बदर या संघटनांचे सदस्य हाेते. शाेपियानच्या चित्रीगाम कलान परिसरात शनिवारपासून चकमक सुरू हाेती. त्या ठिकाणी लपून बसलेल्या दाेन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले. गेल्या दाेन दिवसांमध्ये या ठिकाणी ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. तर अनंतनाग जिल्ह्यात बिजबहाडा क्षेत्रात सेमथान गावात लपलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाला ठार करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती. काश्मीरच्या खाेऱ्यांमध्ये सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या शाेधमाेहिमेदरम्यान तीन दिवसांमध्ये १२ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सेमथान गावात आणखी काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे. 

१४ वर्षांचा फैसल झाला दहशतवादी ठार झालेल्या दहशतवाद्यांत १४ वर्षांचा फैसल गुलजार गनई याचाही समावेश आहे. हा मुलगा काही दिवसांपूर्वीच घरातून पळून दहशतवाद्यांमध्ये सामील झाला हाेता.  कुटुंबीयांनी फैसलला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र, त्याच्यासाेबत असलेल्या अल-बदरचा कमांडर आसिफ शेखने त्याला राेखले. त्यानंतरही त्याला संधी देण्यात आली हाेती. मात्र, त्यावेळी फैसलने नकार दिला.

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर