शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
5
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
6
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
7
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
8
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
9
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
10
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
11
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
12
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
13
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
14
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
15
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
16
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
17
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
18
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
19
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
Daily Top 2Weekly Top 5

१२... सारांश

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

खापरखेडा-भानेगाव येथे पालखी यात्रा

खापरखेडा-भानेगाव येथे पालखी यात्रा
खापरखेडा : भानगाव येथील हनुमान मंदिरातून मंगळवारी सकाळी पालखी यात्रा काढण्यात आली. ही पायी यात्रा रामटेक गडमंदिर येथे नेण्यात आली. सिल्लेवाडा कॉलरीचे व्यवस्थापक आर. ठाकरे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. ४० वर्षांची परंपरा असलेल्या या पालखी यात्रेत शेकडो भाविक सहभागी झाले होते.
***
त्रिशूळ घेऊन भाविक चौरागडला रवाना
खापरखेडा : स्थानिक ३१ भाविक त्रिशूळ घेऊन मध्य प्रदेशातील चौरागडला जाण्यासाठी नुकतेच रवाना झाले. १५१ किलो वजनाच्या या त्रिशूळाचा तिथे अभिषेक केला जाणार आहे. त्यानंतर त्या त्रिशूळाची कोलार नदीच्या तीरावर महाशिवरात्रीला स्थापना केली जाईल.
***
टाकळघाट येथे माकडांचा धुमाकूळ
कान्होलीबारा : नजीकच्या टाकळघाट येथे माकडांनी चांगलाच धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यात घरांचे नुकसान होत असून, नागरिक व मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या माकडांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
***
अवैध दारू विक्री बंद करा!
हिंगणा : तालुक्यातील डिगडोहसह अन्य गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जात आहे. त्यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याने ही दारू विक्री कायमची बंद करावी व विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महिलांसह नागरिकांनी केली आहे.
***
धर्मापुरी येथे मंडईचे आयोजन
धर्मापुरी : धर्मापुरी येथे मंडई व कुस्त्यांच्या आमदंगलीचे आयोजन करण्यात आले. विजेत्या पहेलवानांना बक्षिसे देण्यात आली. मंडईिनमित्त विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पडले. या मंडईला परिसरातील शेकडो नागरिकांनी हजेरी लावली होती.
धर्मापुरी येथे जाहीर सभा
धर्मापुरी : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची धर्मापुरी येथे जाहीर सभा पार पडली. यात स्थानिक व परिसरातील विविध समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सभेला निशा सावरकर, शकुंतला हटवार यांच्यासह अन्य नेते प्रामुख्याने उपस्थित होते.
***
डॉक्टरअभावी गरीब रुग्णांची गैरसोय
निहारवाणी : स्थानिक शासकीय दवाखान्यात डॉक्टर नियमित हजर राहत नसल्याने गरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. स्थानिक बायजाबाई वैद्य (६०) या महिलेचा डेंग्यूसदृश आजाराने उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यामुळे गावात असंतोष निर्माण झाला आहे.
***