१२... करवाही... बावनथडी... जोड...०१
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
-----------चौकट----------
१२... करवाही... बावनथडी... जोड...०१
-----------चौकट----------पिण्याच्या पाण्याची समस्यापुनर्वसितस्थळी प्रकल्पग्रस्तांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येते. वास्तवात तिथे पिण्याच्या पाण्याची प्रभावी सुविधा नाही. या ठिकाणी प्रशासनाने बोअरवेल खोदून हॅण्डपंप बसविले आहेत. सर्व बोअरवेल कोरडे पडल्याने हॅण्डपंप निकामी झाले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना शेतातील विहिरीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा लागत आहे. या पाण्याचे ना शुद्धीकरण केले जात नाही त्यात ब्लिचिंग पावडर टाकले जात. रस्त्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.--------चौकट----------विजेचे खांब केवळ देखाव्यासाठीया पुनर्वसितस्थळी विद्युत पुरवठा करण्यासाठी विजेचे खांब उभे करण्यात आले. त्यावर ताराही जोडण्यात आल्या. मात्र, पथदिवे कधीच प्रकाश देताना दिसून येत नाही. कारण बहुतांश ठिकाणचा वीजपुुरवठा वर्षभरापासून खंडित करण्यात आला आहे. थकीत वीज बिलामुुळे ही समस्या उद्भवल्याचे महावितरण कंपनीचे अधिकारी सांगतात. या प्रकल्पग्रस्तांना दोन वेळचे जेवण दुरापास्त झाले असून, ते ग्रामपंचायत कर देतील कुठून, ग्रामपंचायतकडे उत्पन्नाचे प्रभावी साधन नसल्याने थकीत बिलाचा भरणा करायचा कसा? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.***