१२ धरणे आंदोलन जोड
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
प्रमुख मागण्या : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक सुरू करावी, या बँकेत महादुला बिगर शेती ग्रामीण पतसंस्थेच्या असलेल्या ठेवी परत कराव्या, या पूर्ण ठेवी आताच देणे शक्य नसल्यास त्यातील अर्ध्या म्हणजेच १ कोटी ९१ लाखांपैकी एक कोटी रुपयांच्या ठेवीची रक्कम पतसंस्थेला द्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. नेतृत्व : महादुला बिगर शेती ...
१२ धरणे आंदोलन जोड
प्रमुख मागण्या : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक सुरू करावी, या बँकेत महादुला बिगर शेती ग्रामीण पतसंस्थेच्या असलेल्या ठेवी परत कराव्या, या पूर्ण ठेवी आताच देणे शक्य नसल्यास त्यातील अर्ध्या म्हणजेच १ कोटी ९१ लाखांपैकी एक कोटी रुपयांच्या ठेवीची रक्कम पतसंस्थेला द्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. नेतृत्व : महादुला बिगर शेती ग्रामीण पत सहकारी संस्थेचे अध्यक्ष दत्तराज ठाकरे कार्यकर्ते : डुमण राऊत, शोभा बिसने, काशीनाथ पाटील, दुर्योधन हुड, भुवदेव वांढे, सूर्यभान कातकर, मंगला वांढे, पुष्पा इंगळे, संगीता नागपुरे, भुजंग ढेंगरे, संजय इंगोले, रामाजी इंगोले आदी.अनुसूचित जाती, जमाती अखिल भारतीय परिसंघनागपूर : गोंदिया आणि तिरोडा नगर परिषदेतील वरिष्ठ लिपिकांची रिक्त पदे सेवाज्येष्ठता यादीनुसार पदोन्नती देऊन भरण्यात यावी, अनुकंपाधारकांची नियुक्ती करावी यासह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अनूसूचित जाती, जमाती संघटनांच्या अखिल भारतीय परिसंघातर्फे हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलन करण्यात येत आहे. प्रमुख मागण्या : तिरोडा नगर परिषदेतील तीन आणि गोंदिया नगर परिषदेतील सात वरिष्ठ लिपिकांची पदे सेवाज्येष्ठता यादीनुसार पदोन्नती देऊन भरण्यात यावी, रिक्त पदे असताना पात्रतेनुसार संबंधित जागेवर अनुकंपाधारकांची नियुक्ती करण्यात यावी, तिरोडा नगर परिषदेमध्ये शिपाई पदाचे रोस्टर तयार करण्यात आले. मात्र त्याच्या अधिनस्थ शाळेमध्ये असलेल्या शिपायांना वगळण्यात आले. असे चुकीचे रोस्टर तयार करणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, गोंदियाच्या गोविंदपूर नगर परिषद हायस्कूल व माताटोली हायस्कूल येथे विद्यार्थी - विद्यार्थिनींसाठी शौचालयाची व्यवस्था करावी, तिरोडा नगर परिषदेच्या अग्निशमन विभागात फायरमनची पदे रिक्त आहे. त्या पदासाठी लागणारे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशांत डोंगरे, राजू पालांदूरकर, ईश्वर तुमसरे, हिरालाल साऊसाखळे यांची नियुक्ती करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.नेतृत्व : संघटनेचे विदर्भ प्रदेश महासचिव सुनील मेश्राम, कार्यकर्ते : प्रशांत डोंगरे, राजू पालांदूरकर, रोशन बनकर, मुकेश धारणे, हिरालाल साऊसाखळे, धनपाल नागपुरे, ईश्वर तुमसरे, दिवाकर तागडे, चंदा डकहा आदी.