शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

अमेरिकेतून बाहेर काढलेले ११९ भारतीय आज देशात परतणार; अमृतसरला विमान उतरवण्यावरुन वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 17:55 IST

बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धच्या कारवाईचा भाग म्हणून डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हद्दपार केलेले १२० भारतीय देशात परतणार आहेत.

America Deport Indians: अमेरिकेतून हद्दपार केलेल्या ११९ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन येणारे आणखी एक विशेष विमान शनिवारी रात्री अमृतसर विमानतळावर उतरणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर भारतीयांना हद्दपार करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी अमेरिकेचे लष्करी विमान भारतातील विविध राज्यांतील १०४ बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन अमृतसरला पोहोचले होते. त्यानंतर आता हद्दपार केलेल्या भारतीयांचा दुसरा गट भारतात येणार आहे. हे विमान रात्री १० वाजताच्या सुमारास विमानतळावर उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अमेरिकेचे सी-१७ ग्लोबमास्टर हे लष्करी विमान सुमारे ११९ भारतीय नागरिकांना घेऊन शनिवारी रात्री अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधातील कारवाईचा भाग म्हणून ट्रम्प प्रशासनाने या लोकांना हद्दपार केले आहे. यापूर्वी १०४ भारतीयांना घेऊन एक अमेरिकन विमान अमृतसरला पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्या हाता पायात बेड्या अडकवण्यात आल्या होत्या. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांच्या भेटीनंतर अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांवर भाष्य केलं होतं.

अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या ११९ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांमध्ये सर्वाधिक ६७ लोक पंजाबमधील आहेत. दुसऱ्या क्रमांकावर हरियाणा आहे. हरियाणातील ३३ लोकांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय गुजरातमधील ८, उत्तर प्रदेशातील ३, गोवा, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील प्रत्येकी दोन आणि हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास हे विमान अमृतसर विमानतळावर उतरण्याची शक्यता आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची टीका

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हे विमान अमृतसर विमानतळावर उतरवण्यावरुन प्रश्न उपस्थित केला आहे.  केंद्र सरकार पंजाबची बदनामी करत असल्याचे भगवंत मान यांनी म्हटलं. हे विमान पंजाबमध्ये उतरवणे चुकीचे आहे. अमृतसरसारख्या पवित्र शहराला निर्वासन केंद्र बनवले जात आहे, असंही मुख्यमंत्री मान म्हणाले.

अमेरिकेतील अवैध स्थलांतरितांवर पंतप्रधान मोदींचे आवाहन

अमेरिकेत राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना देश स्वीकारणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं. "हा केवळ भारताचाच प्रश्न नाही. ही जागतिक समस्या आहे. जे लोक बेकायदेशीरपणे इतर देशांमध्ये राहतात त्यांना तेथे राहण्याचा कायदेशीर अधिकार नाही. आम्ही अवैध स्थलांतरितांना परत घेण्यास तयार आहोत. पण ते आमच्यापुरते मर्यादित नाही. हे सामान्य कुटुंबातील लोक आहेत. त्यांना मोठमोठी स्वप्ने दाखवली जातात आणि दिशाभूल करून येथे आणले जाते. त्यामुळे मानवी तस्करीच्या या संपूर्ण व्यवस्थेवर आपण हल्ला केला पाहिजे. अमेरिका आणि भारताने मिळून अशा यंत्रणेला संपवण्याचा  प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून मानवी तस्करी संपुष्टात येईल," असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 

टॅग्स :AmericaअमेरिकाPunjabपंजाबNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प