शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच, आक्रोश अन् किंकाळ्या...; मृतदेह पाहून शिपायाला हार्ट अटॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 05:37 IST

हाथरसपासून ४७ किमी अंतरावर सिकंदराराऊजवळच्या फुलरई गावात नारायण साकार हरी ऊर्फ भाेले बाबांचा सत्संग आयाेजित केला हाेता.

राजेंद्रकुमार

हाथरस - उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एका सत्संगादरम्यान मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत ११६ भाविक ठार झाले. मृतकांत महिला, लहान मुलांचा अधिक समावेश आहे. 

कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली हाेती. कार्यक्रम संपल्यानंतर भाविक बाहेर पडायला लागले तेव्हा एकच गाेंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. महिला आणि मुले  पायदळी तुडविली गेली. संपूर्ण परिसरात केवळ लाेकांच्या किंकाळ्या आणि ओरडण्याचा आवाज ऐकू येत हाेता. सरकारी रुग्णालयाबाहेर भयावह परिस्थिती हाेती. रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच पडला हाेता.

हाथरसपासून ४७ किमी अंतरावर सिकंदराराऊजवळच्या फुलरई गावात नारायण साकार हरी ऊर्फ भाेले बाबांचा सत्संग आयाेजित केला हाेता. त्यास हजाराे भाविक उपस्थित हाेते. सत्संग झाल्यानंतर भाेले बाबांच्या पायाखालील माती घेण्यासाठी भाविकांचे लाेंढे धडकले आणि ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. कार्यक्रम मोकळ्या जागेत होता. पावसामुळे चिखल होता. बाहेर पडण्यासाठी लोक धावले. त्यावेळी काही घसरून पडले व चेंगराचेंगरी झाल्याचेही सांगण्यात येते.

श्वास काेंडल्यामुळे मृत्यू?

सत्संग झाल्यानंतर भाेले बाबांचा ताफा रवाना झाला. सुरक्षारक्षकांनी भाविकांना थांबवून ठेवले हाेते. ताफा गेल्यानंतर गर्दीला अचानक साेडले. दरवाजा गर्दीच्या तुलनेने लहान ठरला. धक्काबुक्की सुरू झाली. चिखलात घसरुन महिला, मुले एकमेकांवर पडली. लाेक त्यांना चिरडून गेले. श्वास काेंडल्यामुळे बहुतांश मृत्यू झाले, असे डाॅक्टरांचे म्हणणे आहे.

गुप्तचर खात्याची नाेकरी साेडून बनले ‘भाेलेबाबा’ प्रवचनकार 

नारायण साकार हरी असे भाेले बाबांचे नाव आहे. एटा जिल्ह्यातील बहादूरनगरी गावातील ते रहिवासी आहेत. तिथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. गुप्तचर खात्यात ते नाेकरी करीत हाेते. १९९०मध्ये नाेकरी साेडून त्यांनी अध्यात्माचा मार्ग पत्करला. साकार विश्व हरी असे नाव घेतले. पांढरा सूट, टाय आणि पांढरे जाेडे असा त्यांचा पेहराव असताे. स्वत:ला हरीचा शिष्य म्हणवतात.

मृतदेह पाहून शिपायाला हार्ट अटॅक

चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या भाविकांचे मृतदेह आणि जखमी लाेकांना एटा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे एवढ्या माेठ्या संख्येने मृतदेह पाहून रुग्णालयात तैनात असलेल्या एका शिपायाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. हा शिपाई अवागड येथे तैनात हाेता. आपत्कालीन परिस्थिती पाहून त्याला एटा येथे पाठविण्यात आले. मात्र, तेथील परिस्थिती पाहून ताे ताण सहन करू शकला नाही.

सर्वतोपरी मदत करू - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र माेदी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. घटनेची माहिती मिळाली त्यावेळी त्यांचे लोकसभेत भाषण सुरू होते. ते थांबवून मोदी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे चेंगराचेंगरीमध्ये अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. मृत्युमुखी पडलेल्यांप्रति मी संवेदना व्यक्त करताे. जखमींनी लवकर बरे हाेण्यासाठी प्रार्थना करताे. 

केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी राज्य सरकारच्या संपर्कात आहेत. मी सर्वांना विश्वास देऊ इच्छिताे की, पीडितांची सर्वताेपरी मदत करण्यात येईल, असे मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. घटनेसाठी काेणीही दाेषी असाे, साेडणार नाही. दाेषींवर कठाेर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश