शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
5
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
6
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
7
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
8
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
9
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
10
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
11
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
12
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
13
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
14
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
15
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
16
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
17
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
18
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
19
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
20
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती

जम्मू-काश्मीरमध्ये 78 दिवसांत 11 दहशतवादी हल्ले; भारतीय सैन्याचा जोरदार पलटवार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 14:45 IST

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सातत्याने हल्ले होत आहेत. भारतीय सैन्यही प्रत्येकवेळी चोख प्रत्युत्तर देत आहे.

Jammu-Kashmir Terrorist Attack : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत, तर एक जण जखमी आहे. जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चकमकीत एका नागरिकाचाही मृत्यू झाला असून, एक जखमी झाला आहे. त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लान्स नाईक प्रवीण शर्मा आणि हवालदार दीपक कुमार यादव, अशी शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत. कालपासून अनंतनागमध्ये ही चकमक सुरू आहे. गडोळेच्या जंगलात आणखी दोन दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली असून, शोध मोहीम सुरुच ठेवण्यात आली आहे. सुरक्षा दलांनी या संपूर्ण परिसराचा घेराव घातला आहे, त्यामुळे दहशतवाद्यांना पळून जाण्याचा कुठलाही मार्ग नाही. लष्कर, निमलष्करी दल आणि राज्य पोलिसांची फौज या परिसरात तैनात केली आहे. 

78 दिवसांत 11 दहशतवादी हल्लेधक्कादायक बाब म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरच्या विविद भागात दहशतवाद्यांकडून सातत्याने हल्ले होत आहेत. दहशतवादी सुरक्षा दलासोबतच सामान्य नागरिकांनाही लक्ष्य करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 78 दिवसांत 11 दहशतवादी हल्ले झाले आहेत. 

  • 15 जुलै- दोडा येथील धारी गोटे उरारबागी येथे हल्ला.
  • 9 जुलै - डोडा येथील गढी भागवा येथे दहशतवादी हल्ला.
  • 8 जुलै- कठुआमध्ये लष्कराच्या वाहनावर हल्ला.
  • 7 जुलै- राजौरी येथील लष्करी छावणीजवळ हल्ला.
  • 26 जून - गंडोह, डोडा येथे दहशतवादी हल्ला.
  • 12 जून- डोडा येथे दहशतवाद्यांनी गोळीबार केला, या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता.
  • 11 जून - गंडोह, डोडा येथे दहशतवादी हल्ला.
  • 11 जून- कठुआच्या हिरानगरमध्ये दहशतवादी हल्ला.
  • 9 जून- रियासीमध्ये कटरा जाणाऱ्या बसवर गोळीबार
  • 4 मे - पूंछमध्ये हवाई दलाच्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला.
  • 28 एप्रिल- उधमपूरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात ग्रामरक्षक जखमी.

पाकिस्तानच्या नापाक कारवायांचा पर्दाफाशकाश्मीर खोऱ्यातील पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआयच्या कारस्थानाबाबत मोठा खुलासा झाला आहे. दहशतवादी सीमेपलीकडून सातत्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पीओकेच्या अनेक भागात दहशतवादी सक्रिय आहेत. आयएसआय या दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत करत आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील 20 भागात दहशतवादी सक्रिय आहेत. एलओसीवरील दहशतवादी हालचालींनंतर भारतीय लष्कर चोवीस तास अलर्ट मोडमध्ये आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान