शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

तिरुपतीच्या १०१ वर्षांच्या वृद्धेची कोरोना संसर्गावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 05:56 IST

मनाने खंबीर असल्यानेच मिळाले यश

तिरुपती : आंध्र प्रदेशमधील तिरुपती येथील श्री वेंकटेश्वर इन्स्टिट्यूूट आॅफ मेडिकल सायन्सेसच्या रुग्णालयात दाखल झालेली १०१ वर्षे वयाची महिला कोरोनाच्या संसर्गातून पूर्णपणे बरी झाली आहे. आपल्या घरी जाण्याचा मार्गही तिने रुग्णवाहिका चालकाला नीट समजावून सांगितला.

मंगम्मा असे त्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर उपचार केलेल्या रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आर. राम यांनी सांगितले की, मंगम्मा मानसिकदृष्ट्या अत्यंत कणखर असून, त्यामुळेच त्या कोरोनावर मात करू शकल्या. कोरोनाच्या संसर्गाची मध्यम स्वरूपाची लक्षणे व कफाचा त्रास होत असलेल्या मंगम्मा यांना १४ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घरातील इतर सर्व सदस्यांची चाचणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला.मंगम्मा यांना कोरोना वॉर्डात दाखल केल्यानंतर त्यांच्या सेवेची जबाबदारी मंजुळा नावाच्या आरोग्यसेविकेकडे सोपविली गेली. मंजुळा यांनी सांगितले की, मंगम्मा यांनी कोणत्याही गोष्टीबद्दल कधीही तक्रार केली नाही. मंगम्मा यांना वृद्धापकाळामुळे व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागतो. मात्र त्या मनाने अतिशय खंबीर आहेत. नातेवाइकांनी नीट पत्ता दिलेला नसल्याने मंगम्मा यांना रुग्णालयातून घरी नेताना थोडी अडचण झाली. त्यावेळी मंगम्मा यांनीच तिरुपतीतील येरमित्ता भागातील घरापर्यंत कसे जायचे तो रस्ता चालकाला समजावून सांगितला.

तिरुपती हे तीर्थक्षेत्र ज्या चित्तूर जिल्ह्यात आहे, तिथे सध्या २८९५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी या जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ३०० नवे रुग्ण आढळून आले. आंध्र प्रदेशमध्ये ४४,४३१ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.उच्चांक मोडलाश्री वेंकटेश्वर इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसच्या रुग्णालयातून याआधी ८९ वर्षे वयाचे गृहस्थ कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतले होते. या रुग्णालयात ९३ वर्षे वयाच्या आणखी एका कोरोना रुग्णावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या