शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

१०१ वर्षांच्या भारतीय आजीबार्इंनी जिंकली धावण्याची शर्यत

By admin | Updated: April 25, 2017 00:49 IST

येथे सुरु असलेल्या ‘वर्ल्ड मास्टर्स गेम्स’ या वृद्धांसाठीच्या जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये मन कौर या १०१ वर्षांच्या भारतीय आजीबाईंनी १०० मीटर धावण्याची स्पर्धा जिंकली.

आॅकलंड : येथे सुरु असलेल्या ‘वर्ल्ड मास्टर्स गेम्स’ या वृद्धांसाठीच्या जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये मन कौर या १०१ वर्षांच्या भारतीय आजीबाईंनी १०० मीटर धावण्याची स्पर्धा जिंकली. शर्यत पूर्ण केल्यावर त्यांनी केलेल्या ‘व्हिक्टरी डान्स’ने तर स्टेडियममदील मोजक्या प्रक्षकांची मनेही जिंकली.मन कौर यांनी १०० मीटर धावण्यासाठी एक मिनिट १४ सेकंद एवढा वेळ घेतला. जमैकाच्या उसेन बोल्टने सन २००९ मध्ये प्रस्थापित केलेल्या जागतिक विक्रमाहून या आजीबाईंना ६४.४२ सेकंदे जास्त लागली. वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धांच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केल्यापासून मन कौर यांनी जिंकलेले हे १७ वे सुवर्णपदकहोते.बुटक्या अंगकाठीच्या मनकौर यांनी धावण्याची सुरुवात जोरात केली, पण शेवटी ‘फिनिशिंग लाईन’वर येताना त्या प्रेक्षकांकडे पाहात रेंगाळत आल्या. अर्थात विजय निश्चित असल्यान त्यांना घाई करण्याचे तसे कारणही नव्हते. कारण १०० किंवा त्याहून जास्त वर्षे वयाच्या स्पर्धकांसाठीच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत त्याच एकमेव स्पर्धक होत्या!न्यूझीलंडमधील वृत्तपत्रांनी ‘चंदीगडचे आश्चर्य’ अशा मथळयांनी कौतुक केलेल्या मन कौर यांचा भरच मुळात स्पर्धेत भाग घेण्यावर होता, घड्याळ््याचे काटे त्यांच्यासाठी दुय्यम होते. आॅकलंडमध्ये होत असलेल्या या स्पर्धांमध्ये एकूण २४,९०५ स्पर्धक भाग घेत असले तरी वयाची शंभरी पार केलेल्या मन कौर या एकमेव स्पर्धक आहेत. वयापुढे हार न मानण्याची या स्पर्धकांची जिद्द इतरांना आणि खास करून तरुणांना नक्कीच स्फूर्तिदायक आहे.स्पर्धेच्या वेळी आई गव्हांकुराचा रस आणि ताक अशा सक्त डाएटवर असते, असे मन कौर यांचे चिरंजीव गौरव सिंग यांनी ‘इंडियन वीकएंडर’ वृत्तपत्रास सांगितले. (वृत्तसंस्था)आणखीही दोघे विक्रमवीर-वयाची शंभरी ओलांडल्यानंतरही खेळांची मैदाने गाजविणाऱ्या मन कौर या एकमेव स्पर्धक नाहीत.शंभरी पार केलेल्या स्पर्धकांचा १०० मीटर धावण्याचा जागतिक विक्रम जपानचे १०५ वर्षांचे हिडेकिची मियाझाकी यांच्या नावावर आहे. त्यांनी ही स्पर्धा २९,८३ सेकंदात जिंकली होती व तेव्हापासून ते ‘गोल्डन बोल्ट’ म्हणून ओळखले जातात.४रॉबर्ट मारचंद या फ्रेंच नागरिकाने वयाच्या १०५ व्या वर्षी एका तासात २२.५४७ किमी (१४.०१ मैल) सायकल चालवून केलेला विक्रमही अद्याप अबाधित आहे.२० पदकांचे लक्ष्य-मन कौर यांच्या वयाची सत्तरी पार केलेल्या मुलाने, गौरव सिंगने आधी या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. नंतर त्याने आईचेही मन वळविले आणि खेळाचा कोणताही पूर्वानुभव नसलेल्या मन कौर वयाच्या ९३ व्या वर्षी सर्वप्रथम मैदानात उतरल्या. तेव्हापासून त्यांनी मिळविलेल्या सुवर्णपदकांची संख्या मायकेल फेल्प्सलाही हेवा वाटावा अशी आहे.