शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Ujjain Mahakal Temple: महाकाल मंदिराच्या खोदकामात 1000 वर्षे जुन्या मंदिरासह सापडल्या शेकडो मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 12:08 IST

Ujjain Mahakal Temple:मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये असलेल्या बाबा महाकाल मंदिराच्या जिर्णोधाराच काम सध्या सुरू आहे.

ठळक मुद्देमंदिराच्या दक्षिण दिशेकडे केलेल्या खोदकामात 2,100 वर्षे जुनी भिंत आढळली आहे.

उज्जैन: मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये असलेल्या बाबा महाकाल मंदिराच्या जिर्णोधाराच काम सध्या सुरू आहे. यासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान 1,000 वर्षे जुने परमार कालीन मंदिर सापडले आहे. याशिवाय, खोदकामादरम्यान 11व्या शतकातील अनेक मूर्तीही मिळाल्या आहेत. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर परमार कालीन वास्तुकलेतील हे अतिशय सूंदर मंदीर सामान्यांनाही पाहायला मिळेल.

2100 वर्षे जुनी भिंत सापडलीजिर्णोधारासाठी 30 मे रोजी महाकाल मंदिराच्या समोरील भागात खोदकाम सुरू असताना देवीची मूर्ती आणि शिलाखंड सापडला होता. याची माहिती मिळताच भोपाळमधून पुरातत्व विभागातील एका टीमला मंदिरात निरीक्षणासाठी पाठवण्यात आले. त्या टीमला लीड करत असलेले पुरातत्व अधिकारी डॉ. रमेश यादव यांनी सांगितले होते की, मंदिराच्या उत्तर दिशेला जमिनीखाली 11 किंवा 12 व्या शतकातील मंदिर दबलेले आहे. यानंतर उत्तर दिशेला खोदकाम सुरू करण्यात आले. तिथे हे प्राचीन मंदिर सापडले. 

मंदिराबाबत पूर्ण माहिती नाहीमंदिराच्या खोदकामात एकानंतर एक प्राचीन वास्तू सापडत आहेत. आतापर्यंत अनेक मूर्ती याठिकाणी सापडल्या असून, मंदिराच्या दक्षिण दिशेकडे  खोदकाम केल्यानंतर 2,100 वर्षे जुनी भिंत आढळली आहे. यापूर्वीही 2020 मध्ये महाकाल मंदिरात 1,000 वर्षे जुने मंदिराचे अवशेष मिळाले होते. डॉ. रमेश यादव म्हणाले की, खोदकामात सापडलेले मंदिर कुणी बांधले, याबाबत अद्याप माहिती नाही. पण, येणाऱ्या काळात खोदकाम पूर्ण झाल्यानंतर या मंदिराची माहिती मिळू शकेल. 

टॅग्स :Templeमंदिरujjain-pcउज्जैन