शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'तृणमूलचे १०० आमदार भाजपमध्ये होणार सामील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 11:26 IST

अर्जुन सिंह यांनी केलेल्या दाव्याची तृणमूल काँग्रेसकडून खिल्ली उडवण्यात आली आहे. तसेच अर्जुन सिंह यांनी डॉक्टरांकडून स्वत:वर उपचार करून घ्यावे, असंही तृणमूलच्या वतीने म्हटले आहे.

कोलकाता - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. यावेळची लोकसभा निवडणूक पश्चिम बंगालमध्ये चुरशीची होणार असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहे. त्यातच आता तृणमूल काँग्रेसचे १०० आमदार आपल्या संपर्कात असून ते कधीही भाजपमध्ये सामील होतील, असा दावा भाजप नेते अर्जुन सिंह यांनी केला आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. अर्जुन सिंह यांनी खुद्द तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. अर्जुन सिंह यांनी केलेल्या दाव्याची तृणमूल काँग्रेसकडून खिल्ली उडवण्यात आली आहे. तसेच अर्जुन सिंह यांनी डॉक्टरांकडून स्वत:वर उपचार करून घ्यावे, असंही तृणमूलच्या वतीने म्हटले आहे.

तृणमूल काँग्रेसचे १०० आमदार आमच्या संपर्कात आहेत. तसेच ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार आहेत. काही आमदार निवडणुकीपूर्वी आणि काही निवडणुकीनंतर भाजपमध्ये सामील होणार असल्याचे अर्जुन सिंह यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगालच्या भाटपुरी मतदार संघातून आमदार राहिलेले अर्जुन सिंह यांचे उत्तर कोलकातापासून नादिया भागात वर्चस्व आहे. आपल्या स्थानिक संपर्कामुळे अर्जुन सिंह आगामी काळात तृणमूल काँग्रेससाठी अडचणीचे ठरू शकतात, असंही समजते.

दरम्यान पश्चिम बंगालमध्ये २२ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी ठेवलेले आहे. यासाठी भाजपकडून पूर्ण तयारी सुरू आहे. पश्चिम बंगालमधील ४० लोकसभा जागांवर सात टप्प्यात मतदान होणार आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकtmcठाणे महापालिकाBJPभाजपा