शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

भारीच! कोरोनावरील लस घेतली अन् अवघ्या ५ दिवसांत १० वर्ष जुना आजार 'छूमंतर'; शिक्षकाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 18:51 IST

कोरोना लस घेतल्यानंतर अवघ्या ५ दिवसांत १० वर्षे जुना आजार बरा झाल्याचा शिक्षकाचा दावा

भोपाळ: देशातील आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. देशात दररोज आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळेच लसीकरणाला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनावरील लस घेतल्यानंतर साईड इफेक्ट्स जाणवतील अशी भीती अनेकांना जाणवते. कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते. मग कशाला लस घ्यायची असा प्रश्नदेखील काहीजण उपस्थित करतात. मात्र मध्य प्रदेशातील एका व्यक्तीला वेगळाच अनुभव आला आहे.त्या व्यक्तींना तीन महिन्यांनी मिळेल कोरोनावरील लस, NEGVAC च्या शिफारशीला आरोग्य मंत्रालयाची मान्यतामध्य प्रदेशातल्या बडवानीमध्ये राहत असलेल्या एका शिक्षकानं कोरोनाची लस घेतली. यानंतर १० वर्षांपासून असलेली खरूज बरी झाल्याचा दावा त्यानं केला. १० वर्षांपासून असलेला खरुजेचा त्रास संपूर्ण बरा झाल्याचं शिक्षक काशीराम यांनी सांगितलं. गेल्या दशकभरापासून काशीराम यांना खरुजेचा त्रास सुरू होता. त्यांनी विविध प्रकारचे उपचार केले. मात्र तरीही त्यांना होणारा त्रास वाढतच होता. त्यांना खुर्चीवरून बसल्यानंतर जमिनीवर पायदेखील ठेवता येत नव्हता. मात्र लस घेतल्यानंतर ५ दिवसांतच त्यांना आराम पडला आणि त्यांची खरुजेची समस्या संपली....तर आणि तरच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव शक्य; IMAच्या अध्यक्षांचा मोलाचा सल्लाग्राम कुंजरीमध्ये वास्तव्यास असलेले काशीराम कनोजे भंवरगढ येथील माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत. १० वर्षांपासून त्यांना पायांमध्ये जळजळ जाणवत होती. त्यामुळे ते खूप त्रासले होते. पायात खूप जळजळ जाणवत असल्यानं त्यांना नीट बसताही येत नव्हतं. शाळेत खुर्चीवर बसल्यानंतर त्यांना जमिनीव पाय ठेवता यायचे नाहीत. त्यामुळे ते दुसऱ्या खुर्चीवर पाय सोडून बसायचे. त्यांना चालतानादेखील वेदना व्हायच्या. पायाला तेलानं मालीश केल्यानंतर त्यांना आराम मिळायचा. पण तो तात्पुरत्या स्वरुपाचा असायचा. ११ एप्रिलला त्यांनी जामनिया उपआरोग्य केंद्रात कोरोनावरील लस घेतली. त्यानंतर पाचच दिवसानंतर त्यांच्या पायाची जळजळ थांबली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या