शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमध्ये सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई; 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 12:22 IST

येथील पुजारी कांकेर परिसरात ही चकमक झाली.

छत्तीसगड: बिजापूर जिल्ह्यात शुक्रवारी भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईत 12 नक्षलवादी ठार झाले. येथील पुजारी कांकेर परिसरात ही चकमक झाली. यावेळी भारतीय जवानांनी 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले, अशी माहिती विशेष पोलीस उपमहासंचालक डी.एम. अवस्थी यांनी दिली. तेलंगणा आणि छत्तीसगढ पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. या चकमकीदरम्यान ग्रे हाऊंडस पथकातील सुशील कुमार हा जवान गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांना 50 ते 60 नक्षलवादी एकत्र जमणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला. यावेळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. यामध्ये 12 नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला. तर उर्वरित नक्षलवादी पळून गेले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये दामोदर आणि लक्ष्मणन या दोघांचाही समावेश आहे. दामोदर उत्तर तेलंगण स्पेशल झोनचा प्रमुख होता. 

 

गेल्याच आठवड्यात सुकमा येथे सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यावेळी 08 कोब्रा बटालियनचे कमांडो प्रकाश चंद यांनी अतुलनीय शौर्याचे दर्शन घडवले होते. या चकमकीदरम्यान त्यांच्या पायात एक गोळी लागली. मात्र, त्यांनी हार न मानता आठ किमी अंतर चालत पार करून रुग्णालय गाठले होते. तत्पूर्वी 18 फेब्रुवारीला सुकमा येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये तब्बल पाच तासांची चकमक झाली होती. पोलिसांनी चकमकीत एका नक्षलवाद्याला ठार केलं होतं. यावेळी एसटीएप आणि डीआरजीचे दोन जवानही शहीद झाले होते. सविस्तर वृत्त लवकरच...

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीIndian Armyभारतीय जवान