शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

दोन केंद्रीय मंत्र्यांसह १० खासदारांनी दिला राजीनामा; आणखी मंत्री राजीनामे देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 13:16 IST

पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, मुख्यमंत्रिपदी नवीन चेहरे?

संजय शर्मा

नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांची नावे भाजपने निश्चित केली असून, या नावांना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे हा सस्पेन्स लवकरच संपणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यात झालेल्या चर्चेत या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावांवर चर्चा झाली. त्यानंतर बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात झालेल्या प्रदीर्घ चर्चेत या तीन राज्यांतील नव्या नेतृत्वाच्या नावाला मंजुरी देण्यात आली. भोपाळ, रायपूर आणि जयपूर येथे होणाऱ्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत या नावांची घोषणा केली जाणार आहे. 

आणखी मंत्री देणार राजीनामे

बाबा बालकनाथ आणि केंद्रीय मंत्री रेणुका सिंह हे दोघेही दिल्लीबाहेर असल्याने राजीनामा देऊ शकले नाहीत; पण तेही राजीनामा देणार आहेत. रेणुका सिंह यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारमधील तीन केंद्रीय मंत्रीही कमी होणार आहेत. नरेंद्रसिंह तोमर हे कृषी मंत्रालय, प्रल्हादसिंह पटेल जलसंपदा आणि अन्न प्रक्रिया मंत्रालय पाहत होते, तर रेणुका सिंह आदिवासी विभागाचे काम पाहत होत्या

विधिमंडळ पक्षाची बैठक शनिवारी?

येत्या एक-दोन दिवसांत या तीन राज्यांत केंद्रीय निरीक्षक पाठवले जातील. ते विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्या नेत्यांच्या नावाची घोषणा करतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. शनिवारी किंवा रविवारी विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते. 

नेमके कोणत्या खासदारांनी दिले राजीनामे? 

लोकसभेतील दहा खासदारांनी सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे बुधवारी सुपूर्द केला. यामध्ये केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल, खासदार राकेश सिंह, रीती पाठक, उदय प्रताप सिंह, गोमती साई, अरुण साव, राज्यवर्धनसिंह राठोड, दीया कुमारी, किरोडीलाल मीणा यांचा समावेश आहे. या सर्व खासदारांनी बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. जे.पी. नड्डा सर्व खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेले. पंतप्रधानांनी विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. त्यानंतर सर्व खासदारांनी लोकसभा सदस्यत्वाचे राजीनामे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केले.

लालदुहोमांना उद्या शपथझोरम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) नेते लालदुहोमा शुक्रवारी मिझोरामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी बुधवारी दिली. तत्पूर्वी, लालदुहोमा यांनी बुधवारी राज्यपाल हरिबाबू कंभामपती यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. शुक्रवारी सकाळी ११:०० वाजता राजभवनात ते शपथ घेतील. 

रेड्डी घेणार आज शपथ तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष ए. रेवंथ रेड्डी गुरुवारी, ७ डिसेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. हैदराबादच्या एलबी स्टेडियमवर शपथविधी सोहळा होणार आहे. विधिमंडळ गटनेते म्हणून निवड झाल्यानंतर रेड्डी यांनी बुधवारी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. 

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूक