शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ऑटो पार्ट्स उद्योगावर संक्रांत; 10 लाख नोकऱ्या धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 17:32 IST

ऑटोमोबाईल उद्योगात मंदीसदृश्य वातावरण

नवी दिल्ली: ऑटोमोबाईल उद्योगात मंदीसदृश्य वातावरण असल्यानं त्याचा थेट परिणाम ऑटो पार्ट्स क्षेत्रावर पाहायला मिळत आहे. वाहनांची विक्री घटल्यानं ऑटो पार्ट्स क्षेत्रातील १० लाख नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. यामुळे सरकारनं ऑटो मोबाईल उद्योगावर लावलेल्या जीएसटीमध्ये बदल करुन दिलासा द्यावा, अशी मागणी ऑटोमोटिव्ह कंपोनन्ट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियानं केली आहे. ऑटो पार्ट्स क्षेत्रात जवळपास ५० लाख कामगार काम करतात. जीएसटीमुळे गेल्या १० महिन्यांपासून वाहनांची विक्री घटली आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्राचा भाग असणाऱ्या सर्व उद्योगांवर सारखाच जीएसटी लावण्याची मागणी ऑटोमोटिव्ह कंपोनन्ट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून (एसीएमए) करण्यात येत आहे. 'जवळपास सर्वच प्रकारच्या वाहनांची विक्री घटली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. अशा प्रकारची समस्या याआधी कधीही उद्भवली नव्हती,' असं एसीएमएचे अध्यक्ष राम व्यंकटरमणी यांनी सांगितलं.  'ऑटो मोबाईल उद्योग वाढल्यावर ऑटो पार्ट्स क्षेत्रालादेखील गती मिळते. मात्र सध्या वाहनांना मागणी नाही. वाहनांची विक्री १५ ते २० टक्क्यांनी घटली आहे. त्याचा थेट परिणाम ऑटो पार्ट्स क्षेत्रावर झाला आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास १० लाख कामगारांचा रोजगार जाईल,' अशी भीती त्यांनी व्यक्त केली. ऑटो पार्ट्स क्षेत्रातील कंपन्यांनी कामगार कपात चालू केली का, या प्रश्नाला व्यंकटरमणी यांनी होकारार्थी उत्तर दिलं. या क्षेत्रातील ७० टक्के कर्मचारी कंत्राटांवर काम करतात. त्यामुळे मागणी कमी झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करावी लागते, असं त्यांनी सांगितलं.  

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाGSTजीएसटीAutomobile Industryवाहन उद्योग