शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून तिकीट बुक केल्यास १0 टक्के सूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 01:59 IST

तुम्ही जर नजीकच्या काळात रेल्वे प्रवासाचे नियोजन करीत असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) वेबसाइटवरून अथवा अ‍ॅपवरून तिकीट बुक केल्यास तिकीट दरात १0 टक्के सवलत मिळणार आहे.

नवी दिल्ली : तुम्ही जर नजीकच्या काळात रेल्वे प्रवासाचे नियोजन करीत असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) वेबसाइटवरून अथवा अ‍ॅपवरून तिकीट बुक केल्यास तिकीट दरात १0 टक्के सवलत मिळणार आहे. ‘आयआरसीटीसी डॉट को डॉट इन’ (irctc.co.in), असे या वेबसाइटचे नाव आहे. ही वेबसाइट अथवा आयआयसीटीसी अ‍ॅपवरून तिकीट बुक करताना पेटीएम अथवा मोबीक्विकद्वारे पैसे अदा केल्यानंतर ही सवलत मिळणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. या हंगामात मोबीक्विक रेल्वे तिकीट खरेदीवर १0 टक्के सवलत देणार आहे. आयआरसीटीसी अ‍ॅप अथवा वेबसाइटवरून तिकीट खरेदी केलेल्या तिकिटाचे पैसे मोबीक्विक अ‍ॅपद्वारे दिल्यास ही सवलत मिळेल. याशिवाय पेटीएमने आपल्या प्लॅटफॉर्मवरून तिकीट बुक केल्यास १00 रुपयांचा रोख परतावा (कॅशबॅक) देऊ केला आहे. फ्लिपकार्टच्या ‘फोनपे’नेही १00 रुपयांचा रोख परतावा देऊ केला आहे. फोनपेवरून पैसे भरल्यास पहिल्या दोन व्यवहारांवर प्रत्येकी ५0 रुपयांचा रोख परतावा मिळणार आहे.या सवलतीचा रेल्वेला लाभ होईल. त्याचप्रमाणे डिजिटल पेमेंट व्यवहार करणाऱ्या कंपन्यांनाही ग्राहक मिळतील. डिजिटल वित्तीय व्यवहारांनाही प्रोत्साहन मिळेल. अशा प्रकारे नव्या पर्यटन हंगामात ही योजना सर्व हितधारकांना लाभदायक ठरणार आहे, असे रेल्वे अधिकाºयाने सांगितले.अशी मिळवा सवलत-आयआरसीटीसी डॉट को डॉट ईन (irctc.co.in ) या वेबसाइटवर अथवा आयआरसीटीसी अ‍ॅपवर जा.-आपला युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.-आपल्या प्रवासाचा तपशील भरा.-कॅप्टशा कोड (captcha code) भरा आणि पेमेंट करण्यासाठी प्रोसीड बटनवर क्लिक करा.-पेमेंट मोडपैकी ई-वॉलेट पर्यायाची निवड करा.-वॉलेट वर्गवारीतील पेटीएम, फ्रीचार्ज अथवा मोबीक्विक यापैकी एका पर्यायाची निवड करा.

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसी