शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

भारतीय कंपनी बनविणार स्पुटनिक व्हीचे 10 कोटी डोस; नववर्षाच्या सुरुवातीलाच लस?   

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 3:42 AM

रशियाने स्पुटनिक व्ही लसीची गेल्या ऑगस्ट महिन्यात सरकार दरबारी नोंदणी केली. सध्या या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. 

मॉस्को : रशियाने विकसित केलेल्या स्पुटनिक व्ही या कोरोना प्रतिबंधक लसीच्या १० कोटींपेक्षा जास्त डोसचे उत्पादन भारतातील हेटेरो ही औषध कंपनी करणार आहे. या लसीच्या प्रत्येक डोसची किंमत १० डॉलर असेल. 

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) या संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे की, पुढच्या वर्षीच्या प्रारंभीपासून स्पुटनिक व्ही या लसीच्या कोट्यवधी डोसच्या उत्पादनाला सुरुवात होईल. ही लस ९५ टक्के परिणामकारक आहे, असा दावा रशियाने नुकताच केला होता. स्पुटनिक व्हीप्रमाणेच जगभरातील काही कंपन्यांनी आपापल्या कोरोना लसीच्या परिणामकारकतेचे अंतरिम अहवाल प्रसिद्ध केले आहेत. प्रत्येक कंपनीने आपली लस ९० टक्के किंवा त्याहून जास्त प्रभावी असल्याचे म्हटले आहे.

रशियाने स्पुटनिक व्ही लसीची गेल्या ऑगस्ट महिन्यात सरकार दरबारी नोंदणी केली. सध्या या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. संबंधित देशांच्या औषध नियंत्रकांनी मान्यता दिल्यास जगभरात पुढच्या वर्षीच्या मध्यापर्यंत १० कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

नववर्षाच्या सुरुवातीलाच लस? प्रारंभी ३५ कोटी लोकांना लस देणार

नवी दिल्ली : पुढच्या वर्षाच्या प्रारंभीच कोरोना लस विकसित झाल्याची खूशखबर तमाम भारतीयांना मिळण्याची शक्यता आहे. कोरोना लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीला ३५ कोटी लोकांना ही लस टोचली जाणार आहे. लसीकरण मोहिमेची पूर्वतयारी सुरू आहे असे आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले.

कोरोना लस विकसित करत असलेल्या तीन कंपन्यांच्या प्रकल्पांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भेट देऊन तेथील संशोधनाच्या प्रगतीची माहिती घेतली. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी वॅक्सिन बूथ बनविण्यात येतील तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक अ‍ॅपही तयार केले आहे. एम्सचे प्रमुख संशोधक डॉ. संजय राय यांनी सांगितले की, स्वदेशी बनावटीच्या कोवॅक्सिन लसीच्या मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू आहे. देशातील २१ वैद्यकीय संस्थांमध्ये सुमारे २५ हजार लोकांवर कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या केल्या जात आहेत. कोवॅक्सिनची सँपल साइज इतर लसींपेक्षा मोठी आहे.

पाच टप्प्यांत लसीकरण मोहीमकोरोना लसीकरण मोहिमेच्या प्रारंभी ३५ कोटी लोकांना ही लस देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात १ कोटी डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी, नर्स, आशा कर्मचाऱ्यांना ही लस टोचली जाईल. दुसऱ्या टप्प्यात कोरोना योद्धयांना ना ही लस देण्यात येईल. त्यामध्ये पालिका कर्मचारी, पोलीस, सुरक्षा जवानांचा समावेश असेल. तिसऱ्या टप्प्यात सरकारी कर्मचारी, चौथ्या टप्प्यात ५० वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेले २६ कोटी लोक व पाचव्या टप्प्यात युवकांना लस टोचली जाईल.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या