(पान -१- मतदान) (पहिल्या आवृत्तीसाठी)
By admin | Updated: May 12, 2014 21:54 IST
सोळाव्या लोकसभेसाठी विक्रमी मतदान
(पान -१- मतदान) (पहिल्या आवृत्तीसाठी)
कामगार उपआयुक्तांची यशस्वी मध्यस्थी : कामगारांत समाधानसातपूर : कामगार उपआयुक्तांच्या दालनात चार तास चाललेल्या बैठकीत वेतनवाढीच्या करारावर सिएट कंपनी व्यवस्थापन आणि कामगार युनियन पदाधिकारी यांच्यात अपेक्षित तोडगा निघाल्याने गेल्या १३ महिन्यांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. यात ७ टक्के उत्पादनवाढ आणि दोन टप्प्यांत कराराचा लाभ मिळणार असल्याने कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिएट कंपनी व्यवस्थापन आणि कामगार युनियन यांच्यात वेतन वाढीच्या करारावर १ एप्रिल २०१३ पासून बोलणी सुरू होती. दरम्यानच्या काळात ३३ बैठका झाल्या होत्या. दरम्यान, कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव यांच्या दालनात झालेल्या बैठकीत व्यवस्थापनाचे दिलीप मोडक, मंजुनाथ राव, राधेशाम केडीया, अभय पंचाक्षरी, श्रीनिवास पत्की, वचन शेी तर मुंबई श्रमिक संघाचे हेमकांत सामंत, स्थानिक पदाधिकारी शिवाजी भावले, सुनील शिंगे, अशोक देसाई, गोकुळ घुगे, दीपक अनावट, अद्याशंकर यादव, पृथ्वीराज देशमुख, प्रमोद बेले, राजन पालव आदि व सहायक कामगार आयुक्त विकास माळी सहभागी झाले होते.रात्री साडेसात वाजेपर्यंत चाललेल्या या बैठकीत कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव यांनी यशस्वी मध्यस्थी करीत अपेक्षित तोडगा काढून प्रलंबित प्रश्न मार्गी लावला. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कामगारांनी सात टक्के उत्पादन वाढ देणे, तसेच पहिल्या २६ महिन्यांसाठी कामगारांना दरमहा ७३०० रुपये आणि दुसर्या टप्प्यात १६ महिन्यांसाठी दरमहा ९१०० रुपये वेतनवाढ कामगारांना मिळणार आहे. या व्यतिरिक्त अजूनही काही मुद्दे असून याबाबत व्यवस्थापन आणि युनियन पदाधिकारी यांनी आपसात चर्चा करून हे मुद्दे मार्गी लावण्याचे बैठकीत ठरले. ४२ महिन्यांसाठी हा करार लागू राहणार आहे. गेल्या १३ महिन्यांपासून वेतनवाढीचा करार प्रलंबित होता. आज अपेक्षित तोडगा निघाल्याने कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.....इन्फो......अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेली असतीसिएट कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात गेल्या १३ महिन्यांपासून वेतनवाढीच्या कराराबाबत बोलणी सुरू होती. जवळपास ३३ बैठका झाल्या होत्या. आजच्या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत मार्ग निघणे गरजेचे होते. कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ कामगार मोठ्या संख्येने जमलेले होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रयत्न करीत होतो. व्यवस्थापन आणि युनियन पदाधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे.- आर. एस. जाधव (कामगार उपआयुक्त)