्रपान १/ दोन प्राध्यापकांना अटक
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
रुरकी आयआयटीच्या
्रपान १/ दोन प्राध्यापकांना अटक
रुरकी आयआयटीच्यादोन प्राध्यापकांना अटकडेहराडून: उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यात अलकनंदा नदीवर बांधण्यात येत असलेला एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी आयआयटी रुरकीच्या दोन प्राध्यापकांना अटक करण्यात आली.हरिद्वारच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक स्विटी अग्रवाल यांनी सोमवारी ही माहिती दिली. संबंधित दुर्घटनेत एका अभियंत्यासह आठ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी आयआयटी रुरकीच्या सिव्हिल इंजिनिअर विभागात कार्यरत प्रोफेसर विपुल प्रकाश आणि विजय कुमार गुप्ता या दोघांना रविवारी संध्याकाळी अटक करण्यात आली.टिहरी जिल्ह्याच्या चौरास भागात अलकनंदा नदीवर बनवण्यात येणार्या पुलाचे डिझाईन याच दोन प्रोफेसर्सनी तयार केले होते. मात्र २०१२ मध्ये बांधकाम सुरू असतानाच हा पुल खचला आणि यात एका अवर अभियंत्यासह आठ जण मृत्युमुखी पडले होते. पुलाच्या बांधकामाचे कंत्राट घेतलेल्या दोन कंपनीच्या मालकांना गत गुरुवारीच अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल या दोन प्राध्यापकांविरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट काढले गेले होते. पोलिसांनी त्यानुसार राहत्या घरातून त्यांना अटक केली. (वृत्तसंस्था)