शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबातील एका महिलेला १ लाख रुपये, काँग्रेसकडून ‘नारी न्याय गॅरंटी’च्या माध्यमातून ५ मोठ्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 14:29 IST

Nari Nyaya Guarantee : प्रत्येक निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिला वर्गाला पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळवण्यासाठी पक्षाने ‘नारी न्याय गॅरंटी’च्या माध्यमातून पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत.

प्रत्येक निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिला वर्गाला पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळवण्यासाठी पक्षाने ‘नारी न्याय गॅरंटी’च्या माध्यमातून पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत. गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी एक लाख रुपये देण्याची घोषणा ही या पाच गॅरंटीमधील प्रमुख घोषणा आहे. या पाच गॅरंटीमुळे देशातील महिलांचं जीवन कायमस्वरूपी बदलणार असल्याचा, दावा ही घोषणा करताना काँग्रेसकडून करण्यात आला आहे. 

सध्या भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधत असलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज सोशल मीडियावर ट्विट करत काँग्रेसने महिलांसाठी देऊ केलेल्या ‘नारी न्याय गॅरंटी’ची घोषणा केली आहे. काँग्रेसने नारी न्याय गॅरंटीच्या माध्यमातून केलेल्या ५ प्रमुख घोषणा पुढील प्रमाणे आहेत.१) महालक्ष्मी: सर्वात गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी एक लाख रुपयांची गॅरंटी२) अर्धी लोकसंख्या, पूर्ण हक्क : केंद्र सरकारमध्ये सर्व नव्या भरती प्रक्रियांचा अर्धा हिस्सा हा महिलांसाठी आरक्षित करण्याची गॅरंटी.३) शक्तीचा सन्मान : आशा, अंगणवाडी आणि मध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या महिलांच्या वेतनामध्ये केंद्र सरकारचं योगदान दुप्पट करण्याची गॅरंटी ४) अधिकार मैत्री: सर्व पंचायतीमध्ये एका अधिकार मैत्रीच्या नियुक्तीची गॅरंटी, जे महिलांना जागरूक करून त्यांना त्यांचे कायदेशीर अधिकार देण्यासाठी मदत करतील   ५) सावित्रीबाई फुले वसतीगृह : देशात नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृहांची संख्या दुप्पट करणे, प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वसतीगृत बांधण्याची गॅरंटी. काँग्रेसचं लक्ष्य देशातील निम्म्या लोकसंख्येला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवणं आणि बरोबरीचं प्रतिनिधित्व देणे हे आहे. या पाच ऐतिहासिक पावलांच्या माध्यमातून काँग्रेस महिलांसाठी समृद्धीचं द्वार उघडणार आहे, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :congressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी