शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आयआयएस बंगळुरुत हायड्रोजन सिलिंडरचा स्फोट; एका शास्त्रज्ञाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 19:51 IST

स्फोटात तीन शास्त्रज्ञ गंभीर जखमी

बंगळुरु: कर्नाटकची राजधानी बंगळुरुतील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात एका शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला आहे. दुपारच्या सुमारास एका हायड्रोजन सिलिंडरचा स्फोट झाला. सध्या बंगळुरु पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. हायड्रोजनच्या सिलिंडरच्या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की, एका शास्त्रज्ञाचा जागीच मृत्यू झाला. मनोज कुमार असं मृत्यूमुखी पडलेल्या शास्त्रज्ञाचं नाव आहे. या स्फोटात तीन संशोधक गंभीर झाले. अतुल्य, कार्तिक आणि नरेश कुमार अशी जखमींची नावं आहेत. त्यांच्यावर सध्या जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. हे चौघेही जण सुपरवेव टेक्नॉलजी नावाच्या स्टार्ट अपमध्ये काम करत होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या एरोस्पेस लॅबमध्ये हा स्फोट झाला. 'घटनास्थळी गॅस किंवा आगीची कोणतीही माहिती मिळाली नाही,' असं लॅबच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.हायड्रोजन सिलिंडरचा स्फोट होताच मनोज लॅबच्या भिंतीकडे फेकले गेले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या ऐरोस्पेस इंजिनियरिंग विभागाचे प्राध्यापक के. पी. जे. रेड्डी आणि जी. जगदीश हे स्टार्ट अप चालवत होते. हे दोन्ही प्राध्यापक शॉकवेव टेक्नॉलजीमध्ये निष्णात आहेत. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सदाशिवनगर पोलिसांकडून सुरू आहे.  

टॅग्स :BengaluruबेंगळूरBlastस्फोटscienceविज्ञान