शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
3
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
4
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
5
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
6
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
7
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
9
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
10
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
11
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
12
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
13
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
14
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
15
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
16
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
17
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
18
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
19
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
20
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन

माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेट बॉम्बहल्ला, मणिपूरमधील घटनेत १ ठार, ५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 06:15 IST

Manipur Violence: मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या दरम्यान, शुक्रवारी विष्णुपूर जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री मायरेम्बम कोइरेंग यांच्या घरावर रॉकेट बॉम्बने हल्ला करण्यात आला आहे. यात एका वृद्धाचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

इम्फाळ - मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या दरम्यान, शुक्रवारी विष्णुपूर जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री मायरेम्बम कोइरेंग यांच्या घरावर रॉकेट बॉम्बने हल्ला करण्यात आला आहे. यात एका वृद्धाचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी मोइरंगपासून दूर ४ किमी अंतरावर असलेल्या ट्रोंगलाओबी परिसरात हा रॉकेट बॉम्बहल्ला झाला. यामध्ये दोन इमारतींचे नुकसान झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे आजपर्यंत कधीही बंदूक किंवा बॉम्बने हल्ला झालेला नाही, त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये घबराट पसरली आहे.

बॉम्बहल्ल्यांमुळे सुरक्षा दले अधिक सतर्क झाली आहेत. हल्ले करणाऱ्या ड्रोनना लक्ष्य करण्यासाठी मीडियम मशिनगन मणिपूरमध्ये वापरण्यास लष्कराला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. अशा प्रकारची मशिनगन या राज्यात प्रथमच वापरली जाईल.

याआधी मणिपूरमध्ये करण्यात आलेले दोन ड्रोन हल्ले हे सीमेपलीकडून करण्यात आल्याचा सुरक्षा दलाचा कयास आहे. म्यानमारमधून दहशतवादी ड्रोन हल्ले करत असल्याची शक्यता सुरक्षा दलांनी व्यक्त केली आहे.

मशिनगनचा वापरड्रोनद्वारे होत असलेले हल्ले लक्षात घेऊन तिथे ड्रोनला लक्ष्य करू शकणाऱ्या मीडियम मशिनगनचा वापर करण्यास सुरक्षा दलांना परवानगी देण्यात आली आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या ड्रोन हल्ले रोखण्याबाबत  सरकार काही महत्त्वाची पावले येत्या काही दिवसांत उचलण्याची शक्यता आहे. एका जमातीच्या दहशतवाद्यांना म्यानमारमधून ड्रोन हल्ल्यांसाठी तांत्रिक सहकार्य व प्रशिक्षण मिळत असल्याचा सुरक्षा दलांचा कयास आहे. सध्या मणिपूरमध्ये केंद्रीय दलाच्या १९८ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. (वृत्तसंस्था)

ड्रोन हल्ल्यांचा मानवी साखळी करून निषेध- मणिपूरमध्ये झालेल्या दोन ड्रोन हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी इम्फाळ खोऱ्यातील पाच जिल्ह्यांत मानवी साखळी तयार करण्यातआली होती. -त्या राज्यामध्ये निर्माण झालेली स्थिती सरकार नीट हाताळत नसल्याचा आरोप कोऑर्डिनेटिंग कमिटी ऑन मणिपूर इंटेग्रिटी (कोकोमी) या संघटनेने केला आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार