शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

शेती शिकणाऱ्या विद्यार्थिनीची भरारी; करणार 1 कोटीची वार्षिक कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 16:06 IST

कॅनडात मल्टी नॅशनल कंपनीत प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करणार 

जालंधर: देशात पहिल्यांदाच कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्याला 1 कोटींचं वार्षिक पॅकेज मिळालं आहे. बेयर ग्रुपच्या मॉन्सेंटो कंपनीनं पंजाबच्या कविता फमनला तब्बल 1 कोटींचं पॅकेज दिलं आहे. गुरुदासपूरची रहिवासी असणारी कविता जालंधरच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधून शेती विषयात एमएससी करते आहे. तिला 2,00,000 कॅनेडियन डॉलरचं (1 कोटी 2 लाख रुपये) पॅकेज देण्यात आलं आहे. मॉन्सेंटोनं कॅनडा विभागाच्या मॅनिटोबा ऑफिसमधील उत्पादनाची जबाबदारी कविताकडे सोपवली आहे. कविता उत्पादन व्यवस्थापक म्हणून काम करेल. या महिन्यापासून ती काम सुरू करणार आहे. कंपनीत होणारं उत्पादन तिच्या अंतर्गत येईल. उत्पादन क्षेत्राशी संबंधित नियोजन आणि समन्वय राखण्याची जबाबदारी तिच्याकडे असेल. या नोकरीसाठी सुरुवातीला कवितानं एक परीक्षा दिली होती. त्यानंतर मॉन्सेंटोच्या अधिकाऱ्यांनी तिची मुलाखत घेतली. मॉन्सेंटोनं दिलेल्या ऑफरनं स्वप्न सत्य उतरल्याची भावना कवितानं बोलून दाखवली. 'तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात बदल होत आहेत. अनेक अत्याधुनिक गोष्टींचा समावेश शेतीत केला जात आहे. त्यामुळेच कंपनीत रुजू होण्याआधीच मला अतिशय उत्साही वाटतं आहे. मी पुढील काही वर्षे शक्य तितक्या नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करेन,' असं कवितानं सांगितलं. कवितानं मिळवलेल्या यशाबद्दल विद्यापीठानं आनंद व्यक्त केला. आतापर्यंत कृषी विभागातील विद्यार्थ्यांला कधीच इतकं मोठं पॅकेज मिळालं नव्हतं, असं एलपीयूचे संचालक अमन मित्तल यांनी म्हटलं. कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्याला पहिल्यांदाच सात आकडी पगार मिळाला आहे. विशेष म्हणजे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच कविताला इतक्या मोठ्या पगाराची नोकरी मिळाल्यानं अतिशय आनंद झाल्याचं मित्तल म्हणाले.  

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र