तळीये दरडग्रस्तांना जिल्हा परिषदेचा ‘आधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:06 AM2021-08-02T04:06:27+5:302021-08-02T04:06:27+5:30

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी या संदर्भात मदतीचे आवाहन केले होते. ...

Zilla Parishad's 'support' for bottomless victims | तळीये दरडग्रस्तांना जिल्हा परिषदेचा ‘आधार’

तळीये दरडग्रस्तांना जिल्हा परिषदेचा ‘आधार’

Next

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी या संदर्भात मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांनी तळीये गावचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधत आवश्यक मदतीचा तपशील घेतला व त्याद्वारे पदाधिकारी, सदस्य, खातेप्रमुख, कर्मचारी संघटनांनी एकत्रितरित्या सुमारे सहा लाख रुपयांच्या गृह उपयोगी वस्तूंचे संकलन केेले. त्यात तळीये या दरडग्रस्त गावास साधारणपणे १२५ कुटुंबांसाठी, पोळपाट, लाटणे, तवा, कढई, बादली, हंडा, कळशी, बेडशीट, चादर, बनियन, साडी, ब्लॅंकेट, ताटे, स्टील ताटे, वाट्या, सांडशी, चमचे, किटली, वाट्या, मोठा डबा, टॉवेल, टूथब्रश, टूथपेस्ट, प्लास्टिक बादली, गॅस शेगडी याप्रमाणे संपूर्ण सेट तयार करून प्रत्येक कुटुंबास एक याप्रमाणे दिला जाणार आहे.

शनिवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष क्षिरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांच्या उपस्थितीत मदतीच्या वस्तूंनी भरलेला ट्रक रायगड जिल्ह्याकडे रवाना करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, रवींद्र परदेशी, आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, कार्यकारी अभियंता दादाजी गांगुर्डे, महेंद्र पवार, रवींद्र आंधळे, रणजित पगारे, शीतल शिंदे, गणेश बगड, प्रकाश थेटे, जी. पी. खैरनार, विक्रम पिंगळे, पांडुरंग वाजे, अंबादास वाजे, अंबादास पाटील, विजयकुमार हळदे, विजय देवरे, प्रमोद निरगुडे, सचिन विंचूरकर आदी उपस्थित होते.

(फोटो ३१ झेडपी)

Web Title: Zilla Parishad's 'support' for bottomless victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.