शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

जिल्हा परिषदेची आज विशेष आमसभा

By admin | Updated: April 15, 2017 23:30 IST

विषय समित्यांचे खातेवाटप; सदस्यांची होणार निवड

नाशिक : जिल्हा परिषदेची रविवारी (दि.१६) विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असून, या विशेष सर्वसाधारण सभेत सहा विषय समित्यांचे तीन पदाधिकाऱ्यांना खातेवाटप तसेच विविध दहा विषय समित्यांवर सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीत अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा होत असून, सभेच्या विषय पत्रिकेत विविध विषय समित्यांचे खातेवाटप तसेच विविध विषय समित्यांवर सदस्यांची निवड करणे आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत विषय समित्यांसाठी नामनिर्देशन व माघारी तसेच दुपारी २ वाजता विशेष सभेच्या कामकाजाला सुरुवात करण्यात येईल. विषय क्रमांक दोननुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम ८३(२) च्या तरतुदीनुसार जिल्हा परिषद उपाध्यक्ष व अन्य दोन समित्यांचे सभापती यांच्याकडे विषय समितींचा पदभार सोपविण्याबाबत कार्यवाही आहे. त्यात जिल्हा परिषद अध्यक्ष हे स्थायी समिती तसेच जलव्यवस्थापन व स्वच्छता समितींचे पदसिद्ध सभापती आहेत. तसेच समाजकल्याण, महिला व बालकल्याण समिती सभापती यांची पदनामनिशी ५ एप्रिलला निवड झालेली आहे. त्यामुळे उपाध्यक्ष व अन्य दोन विषय समिती सभापती यांना प्रत्येकी दोन याप्रमाणे सहा विषय समित्यांचे वाटप करावयाचे आहे. कलम ८३ (३) नुसार कृषी व पशुसंवर्धन समितीसाठी एक सभापती असेल तर अर्थ, बांधकाम, शिक्षण व आरोग्य या चार समित्यांचा प्रभार प्रत्येकी दोन याप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे. विषय क्रमांक तीननुसार स्थायी समितीसाठी आठ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे, तर विषय क्रमांक ४ नुसार जलव्यवस्थापन समितीवरील सहा सदस्यांची निवड करण्यात येईल. विषय क्रमांक ५, ६ व ७ नुसार अनुक्रमे कृषी, समाजकल्याण व शिक्षण समितीवर सदस्यांची निवड करण्यात येईल. विषय क्रमांक-८ नुसार बांधकाम समिती सदस्यांची निवड करण्यात येईल. बैठकीचे एकूण १२ विषय असून, त्यानुसार सदस्यांची निवड करण्यात येणार असल्याचे कळते. (प्रतिनिधी)