शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
6
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
7
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
8
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
10
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
11
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
12
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
13
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
14
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
15
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
16
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
17
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
18
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
19
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
20
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही

जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीस मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 1:26 AM

नाशिक : जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकाम शासनाने मंजुरी दिली असून, तसा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. ...

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात २५ कोटी मंजूर : शासनाचे परिपत्रक जाहीर

नाशिक : जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकाम शासनाने मंजुरी दिली असून, तसा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. इमारतीच्या पहिल्या टप्प्यांच्या कामासाठी २५ कोटी रुपयेदेखील मंजुरी करण्यात आले आहे.नाशिक जिल्हा परिषदेची सध्याची इमारत अत्यंत जुनी झाल्याने कामाजाचा आवाका लक्षात घेता जिल्हा परिषदेसाठी नूतन प्रशासकीय इमारत बांधण्याचा ठराव सर्वसाधारण सभेने २५ डिसेंबर २०१७ रोजी केला होता. त्र्यंबकरोडवरील पशुसंवर्धन खात्याच्या जागेवर इमारत बांधण्याचा निर्णय होऊन त्याबाबत शासनालाही कळविण्यात आले होते.यासंदर्भात पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी ग्रामणविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत पशुसंवर्धन विभागाची जागा जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याबाबत संमती दर्शविली होती.पहिल्या टप्प्यासाठी २५.८८ कोटी रुपये मंजूरजिल्हा परिषदेने नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी तयार केलेल्या आराखड्यास महाराष्ट्र शासनाने तत्त्वत: मंजुरी दिलेली आहे. सदर आराखड्यानुसार मूळ प्रस्तावानुसार तळमजला अधिक सहा मजले असे एकूण १३,५६५.३४ चौरस मीटरचे बांधकाम प्रस्तावित आहे. मुख्य कार्यकारी अधिकारीडॉ. नरेश गिते यांनी सादर केलेल्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या प्रस्तावाची उच्च अधिकार समितीने छाननी केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या एकूण प्रस्तावापैकी पहिल्या टप्याच्या बांधकामासाठी २५ कोटी ८८ लाख रुपयांस मान्यता दिली आहे.त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या इमारतीला लवकरच मुहूर्त लागणार असल्याने शासनाकडून मिळालेल्या मंजुरीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदGovernmentसरकार