शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी तातडीने प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:55 IST

अवकाळी पावसामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील अनेक शाळांचे पत्रे व कौले उडून गेली असून, सध्या शाळा सुरू झाल्याने कधीही पावसाचे आगमन होवू शकते. त्यामुळे अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे पावसापासून बचाव करण्यासाठी पत्रे उडालेल्या शाळांची दुरुस्ती करण्याचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत देण्यात आल्या.

ठळक मुद्देशिक्षकांच्या नियुक्त्या सोमवारपर्यंत

नाशिक : अवकाळी पावसामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील अनेक शाळांचे पत्रे व कौले उडून गेली असून, सध्या शाळा सुरू झाल्याने कधीही पावसाचे आगमन होवू शकते. त्यामुळे अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे पावसापासून बचाव करण्यासाठी पत्रे उडालेल्या शाळांची दुरुस्ती करण्याचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत देण्यात आल्या.स्थायी समितीची सभा अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी शाळा दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी प्राप्त झालेला असतानाही ग्रामीण भागातील शाळा दुरुस्ती होत नसल्याबद्दल नागरिक तक्रारी करीत असून, शिक्षण विभागाला किती निधी प्राप्त झाला आणि त्यातून कधी कामे होणार असा सवाल केला, तर आत्माराम कुंभार्डे यांनी चांदवड तालुक्यात अवकाळी वादळी पावसामुळे अनेक शाळांचे पत्रे उडाल्याने त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, दुरुस्ती करावयाच्या शाळांचा प्राधान्यक्रम ठरवून समितीची मान्यता मिळण्याची वाट न पाहता ज्या शाळांचे पत्रे उडाले व किरकोळ खर्चाचे काम असेल तर त्याचे स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनीही सहमती दर्शवित वादळामुळे नुकसान झालेल्या शाळांची माहिती सदस्य, गट शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांकडून मागवून प्राधान्यक्रम ठरवावे व शिक्षण समितीच्या बैठकीत त्याची मान्यता घेऊन आठ दिवसांत आपल्याकडे स्वतंत्र प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश दिले.शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी शाळा दुरुस्तीसाठी आठ कोटींचा निधी प्राप्त झाला असल्याचे सांगून, २८ जून रोजी शिक्षण समितीच्या बैठकीत शाळा ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले. आंतरजिल्हा बदली करून आलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीबाबत मनीषा पवार यांनी प्रश्न विचारून लवकरात लवकर शिक्षकांना नियुक्त्या देण्याची मागणी केली. त्यावर शासनाकडून नियुक्ती देण्याबाबत नवीन आदेश प्राप्त झाले असून, त्यानुसार येत्या सोमवारपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.शाळेसाठी शिक्षणमंत्र्यांना भेटणारकन्या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू असले तरी, त्यासाठी शिक्षक मान्यता नाही. त्यामुळे नेहमीच या शाळेचा प्रश्न निर्माण होत असल्याबद्दल कुंभार्डे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर चार महिला शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असली, त्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्र्माण होत असल्यामुळे शासनाकडे तसा प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. कन्या शाळा जिल्हा परिषदेसाठी आवश्यक असून, गरिबांची मुले येथे शिक्षण घेतात त्यामुळे प्रसंगी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्याकडे बैठक घेण्यात येईल, असे अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सांगितले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदSchoolशाळा