शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

गैरहजर अधिकाऱ्यांवर वेतन कपातीची कारवाई जिल्हा परिषद : मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 12:24 AM

नाशिक : मुख्यालय तसेच तालुकास्तरावर अनुपस्थित असलेल्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी अशा एकूण ३० जणांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले.

ठळक मुद्देअधिकाºयांकडून फारसे गांभिर्याने घेतले जात नसल्याचे पुन्हा एकदा समोरसंबंधितांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कारवाई

नाशिक : मुख्यालय तसेच तालुकास्तरावर अनुपस्थित असलेल्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी अशा एकूण ३० जणांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले. गेल्या काही दिवसांपासून अधिकाºयांच्या कार्यपद्धतीवर गिते यांनी लक्ष केंद्रित करूनही अधिकारी, कर्मचाºयांमध्ये फारसा बदल झाला नसल्याचे या कारवाईवरून दिसून आले. अधिकाºयांनी नियमांच्या चौकटीत राहून काम करताना निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी वारंवार अधिकाºयांना कामाबाबत सूचना करीत आहेत. प्रत्यक्षभेटी आणि व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधताना अधिकाºयांना कामाबाबतची तंबी दिली जात असतानाही तालुकापातळीवर अधिकाºयांकडून फारसे गांभिर्याने घेतले जात नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले. गुरुवारी गिते यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाºयांशी संवाद साधला तेव्हा अनेक अधिकारी गैरहजर असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधितांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कारवाई केली. विशेष म्हणजे मुख्यालयातही अनेक अधिकारी अनुपस्थित असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. गिते यांनी जिल्हा परिषद अंतर्गत होणारे काम, विकास योजना या विहित वेळेत पूर्ण करण्याकडे अधिक भर दिला आहे. त्यादृष्टीने आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच विविध योजनांबाबत गुणांकन करून त्याचे मूल्यांकन करण्यात येत आहे. तालुका व ग्रामस्तरावरील कामकाज गतिमान व्हावे यासाठी तालुकास्तरीय आढावा बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकींच्या अनुषंगाने गुरुवारी डॉ. गिते यांनी जिल्हास्तरीय खातेप्रमुखांसोबत तालुकास्तरावरील गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी तसेच अन्य सर्व विभागप्रमुखांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत डॉ. गिते यांनी जिल्हास्तरावरील प्रलंबित विषयांची माहिती तत्काळ तयार करून आढावा बैठकीपूर्वी जिल्हा स्तरावर पाठविण्याचे निर्देश दिले. तसेच सर्व ध्वजांकित योजनांचे गुणांकन तयार करून त्यानुसार बैठकीत माहिती सदर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तालुकास्तरावर बैठकीच्या आदल्या दिवशी गटविकास अधिकारी यांनी गोपनीय अहवाल प्रतिवेदन व पुनर्विलोकन शिबिर घेऊन त्याद्वारे सर्व कर्मचाºयांचे गोपनीय अहवाल प्रतिवेदन व पुनर्विलोकन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुख आढावा बैठकीच्या दिवशी सकाळी ८.३० ते १०.०० पर्यंत सर्व गोपनीय अहवालांचे पुनर्विलोकन करणार आहेत. या उपक्रमामुळे प्रशासनाचे मोठे काम अचुकतेने कमी कालावधीत पूर्ण होणार असल्याचा विश्वास गिते यांनी व्यक्त केला.रजेसाठी लागेल मुख्य कार्यकारी अधिकाºयांची परवानगीव्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक असताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणाचीही रजा मंजूर न करण्याचे आदेशही सर्व गटविकास अधिकारी व खातेप्रमुखांना दिले आहेत. गुरुवारची व्हिडीओ कॉन्फरन्स पूर्वनियोजित असतानाही तालुकास्तरावरील वित्त विभागातील ३ सहायक लेखाधिकारी, कृषी विभागातील ८ कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी, शिक्षण विभागातील १ गटशिक्षण अधिकारी, पशुसंवर्धन विभागातील ४ अधिकारी, लघुपाटबंधारे विभाग पूर्व व पश्चिमचे २ अधिकारी, आरोग्य विभागाकडील ४ तालुका वैद्यकीय अधिकारी, बाल विकास विभागातील १ बाल विकास अधिकारी, सुरगाणा गटविकास अधिकारी, बांधकाम विभागातील ६ उपअभियंता असे एकूण ३० अधिकारी व कर्मचारी पूर्वपरवानगी न घेता गैरहजर असल्याने त्यांचे आजच्या दिवसाचे वेतन कपात करण्याच्या सूचना डॉ. गिते यांनी खातेप्रमुखांना दिल्या.