शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जायखेडा :जिलेटिन, डिटोनेटरचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 02:02 IST

बागलाण तालुक्याजवळच्या महाराष्ट्र-गुजरात सरहद्दीवर सुरू असलेल्या नाकेबंदी दरम्यान जिलेटिन व डिटोनेटरचा मोठा साठा जप्त करण्यात जायखेडा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी पिकअप गाडी व तीन लाख पस्तीस हजार शंभर रुपये किमतीच्या स्फोटकांसह एका आरोपीस ताब्यात घेतले

ठळक मुद्देमहाराष्ट्र-गुजरात सरहद्दीवर नाकेबंदी, स्फोटकांसह आरोपी ताब्यात, एक फरार

जायखेडा : बागलाण तालुक्याजवळच्या महाराष्ट्र-गुजरात सरहद्दीवर सुरू असलेल्या नाकेबंदी दरम्यान जिलेटिन व डिटोनेटरचा मोठा साठा जप्त करण्यात जायखेडा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी पिकअप गाडी व तीन लाख पस्तीस हजार शंभर रुपये किमतीच्या स्फोटकांसह एका आरोपीस ताब्यात घेतले असून, एक आरोपी फरार झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून गुजरातकडे स्फोटके घेऊन जाण्याचा आरोपींचा काय उद्देश होता, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून पिकअप गाडी थांबवून तपासणी सुरुवात केली असता गाडीत बसलेला एक इसम अचानक अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला.यावेळी चालकाला तातडीने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानेही उडवाउडवीचीदेण्यास सुरु वात केल्याने पोलिसांचा संशय बळावला. यावेळी पिकअपची कसून तपसणी केली. या वाहनात तब्बल २१५० जिलेटिनच्या कांड्या व १७५० डिटोनेटरचे नग आढळून आले.या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी विनापरवाना स्फोटके बाळगल्याप्रकरणी व मानवी जिवास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी भारतीय स्फोटक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, पिकअपचालक भवरलाल शंभूलाल गुर्जर, रा. करणीपाडा, पंचायत छतरपुरा, ता. आसीन, जि. भिलवाडा, राजस्थान याला अटक केली असून, याचा दुसरा साथीदार बुधलाल तुलसीराम गुजर रा. राजस्थान हा फरार असून, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, एएसआय सोनवणे, पो. ना. पाटील, थैल, वाघ, पो. शि. माळी हे तपास करीत आहेत.चिचली घाटलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना कोम्बिंग आॅपरेशन राबवून सतर्कराहण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जायखेडा पोलिसांकडून मुल्हेरजवळच्या महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील चिचली घाट येथे रात्री नाकाबंदी सुरु असताना सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव व त्यांच्या पथकाला मुल्हेरकडून गुजरातकडे महेंद्रा कंपनीचे पिकअप क्र मांक आरजे ०६ जीसी २१८५ ही वेगाने पळून जाताना आढळली.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी