शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

झाकीर हुसेन रुग्णालयात टाकीच्या दुरुस्तीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 01:04 IST

महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या बुधवारी (दि.२१) ऑक्सिजन टाकीला गळती लागण्याच्या दुर्घटनेनंतर आता या १३ केएल टाकीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रविवारी (दि.२५) युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेल्या या कामामुळे रूग्णांना  ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी दोन पर्यायी टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हे काम सोमवारी (दि.२६) सायंकाळपर्यंत चालण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देतंत्रज्ञांची धावपळ : आज सायंकाळी होणार पूर्ण

नाशिक :   महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या बुधवारी (दि.२१) ऑक्सिजन टाकीला गळती लागण्याच्या दुर्घटनेनंतर आता या १३ केएल टाकीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रविवारी (दि.२५) युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेल्या या कामामुळे रूग्णांना  ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी दोन पर्यायी टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हे काम सोमवारी (दि.२६) सायंकाळपर्यंत चालण्याची शक्यता आहे.गेल्या बुधवारी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी ऑक्सिजन रिफिल करताना गळती झाल्याने व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा कमी झाला आणि २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता, गेल्या ३१ मार्च रोजीच बसण्यात आलेल्या या टाकीच्या  व्हॉल्व्ह अवघ्या २१ दिवसांत निकामी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते, तर टाकी बसवण्याबरोबरच देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराचे अधिकारी तब्बल ४८ तासांनी दाखल झाले होते. महापालिकेने पुण्यातील टायो निपॉन सान्सो कॉर्पोरेशनला काम दिले असून, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तंत्रज्ञ न ठेवल्याने महापालिकेला अन्य खासगी पुरवठादारांकडून तंत्रज्ञ मागवून दुरुस्ती करावी लागली होती. कंपनीचे अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी त्यांना टाकीची दुरुस्ती करण्याबरोबच तंत्रज्ञ नियुक्त करण्यास सांगितले होते. त्यानुसार कंपनीने काम सुरू केले आहे. त्यासाठी खास पुण्याहून तंत्रज्ञांचे पथक दाखल झाले आहे. रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी रविवारी (दि.२५)  एकेक किलो लिटर्सच्या दोन टाक्या बसवण्यात आल्या आहेत. दोन टाक्या तात्पुरत्या टाकीच्या दुरुस्तीआधी तात्पुरत्या स्वरूपात दोन नव्या छोट्या टाक्या बसवल्या आहेत. त्यातून रुग्णालयात पुरवठा सुरळीत झाल्यानंतर मुख्य टाकीतील पुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात  येईल. सोमवारी (दि.२६) सायंकाळपर्यंत नव्या टाकीच्या दुरस्तीचे काम पूर्ण होईल, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashik Oxygen Leakageनाशिक ऑक्सिजन गळती