त्र्यंबकेश्वर : गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गाजरवाडी पोस्ट अंजनेरी येथील वाळू मंगळू लचके (२८) या युवकाने अंजनेरी गडावरून उडी घेऊन आत्महत्त्या केली.आज सकाळी मयत युवकाने ९वा लालू महादू लचके यांना फोन करून काही वेळात मी घरच्यांना भेटणार नसल्याचे सांगून फोन कट केला. त्यानंतर शोधाशोध केल्यानंतर वाळू लचके या युवकाचा मृतदेह अंजनेरी गडाच्या पायथ्याशी सापडला. लालू महादू लचके यांच्या खबरीवरून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दिलीप वाजे तपास करीत आहेत. (वार्ताहर)
अंजनेरी गडावरून उडी मारून युवकाची आत्महत्त्या
By admin | Updated: July 15, 2016 23:51 IST